मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्यास तक्रारदारांवरही कारवाई करणार : पोलीस आयुक्त

मॉब लिंचिंगची वाढवून-चढवून खोटी तक्रार दिली तर त्या तक्रारदारांवरही कारवाई करणार असल्याचे मत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्यास तक्रारदारांवरही कारवाई करणार : पोलीस आयुक्त
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 1:10 PM

औरंगाबाद : मागील काही दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये 2 मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी (22 जुलै) एका झोमॅटो कामगाराला ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण केल्याची घटना घडली. यावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मॉब लिंचिंगची वाढवून-चढवून खोटी तक्रार दिली तर त्या तक्रारदारांवरही कारवाई करणार असल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त प्रसाद म्हणाले, “मागील काळी दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये मॉब लिंचिंगच्या 2 घटना घडल्या. त्यातील एका घटनेचा व्हिडीओ आम्हाला मिळाला आहे. त्या व्हिडीओचा तपास सुरु आहे. त्यात जर तक्रारदारांनी तक्रार वाढवून सांगितल्याचे आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.”

दरम्यान, देशभरात धार्मिक उन्मादाचे वातावरण वाढत असताना राज्यातही अशाच काही घटना घडलेल्या आहेत. औरंगाबादमधील आझाद चौकात सोमवारी रात्री झोमॅटोत काम करणाऱ्या मुस्लीम कामगाराला ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण केल्याचा आरोप झाला होता. पीडित व्यक्तीवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचंही सांगण्यात आलं होतं. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली होती.

या घटनेमुळे सोमवारी औरंगाबादमधील आझाद चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी जमा झालेल्या जमावाने आरोपींवर गुन्हे दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला आणि तणाव निवळला. सिडको पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.