औरंगाबाद शिवजयंती | दोन दिवस क्रांती चौकातील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर

शुक्रावारी रात्री दहा वाजता क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई तसेच शहरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते प्रत्यक्षरित्या उपस्थित असतील.

औरंगाबाद शिवजयंती | दोन दिवस क्रांती चौकातील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:29 PM

औरंगाबाद| शहरातील मध्यवर्ती भागातील क्रांती चौक येथे शिवजयंती (Aurangabad Shiv Jayanti) निमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असून 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला क्रांती चौक (Kranti Chauk) येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध संघटनांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ढोलपथक, लेझीम पथक, तलवारबाजीची प्रात्यक्षिकं आयोजित कऱण्यात आली आहेत. शिवसेना, मनसेच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सादरीकरणही होत आहे. क्रांती चौकात शेकडो शिवप्रेमींची गर्दी जमली असून वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारसाठी औरंगाबाद शहरातील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.

शहरातील वाहतुकीत काय बदल?

पुढील दोन दिवस शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून नागरिकांनी यानुसार सहकार्य करावे असे आवाहन, वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे. – 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत तसेच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्रांती चौक परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. – सिल्लोखाना ते क्रांती चौक, गोपाल टी ते क्रांती चौक, सतीश मोटर्स ते अमरप्रीत चौक आणि अमरप्रीत चौक ते सतीश मोटर्स हा पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोडही बंद असेल. – गोपाल टी ते संत एकनाथ रंगमंदिर-काल्डा कॉर्नर-अमरप्रीत चौक या मार्गासह सिल्लेखाना चौक- सावरकर चौक- सतीश मोटर्स तसेच शिवाजी हायस्कूल हा पर्यायी रस्ता आहे. – क्रांती चौक उड्डाणपुलावरील वाहतूक सुरु राहणार – क्रांती चौक उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रोड आणि क्रांती चौक उड्डाण पूल पश्चिमेकडील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड बंद ठेवण्यात येणार आहेत.

शुक्रवारी रात्री क्रांती चौक दणाणून उठणार

शुक्रावारी रात्री दहा वाजता क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई तसेच शहरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते प्रत्यक्षरित्या उपस्थित असतील. देशातील सर्वात उंच असा हा शिवरायांचा पुतळा असून गेल्या काही वर्षांपासून शिवप्रेमी शिवरायांच्या प्रतिमेचं हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी आतूर आहेत. आज अखेर तो क्षण आला असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यावेळी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत डीजे, ढोल, ताशे आणि आतिषबाजीलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री क्रांती चौक दणाणून उठणार आहे.

इतर बातम्या-

Memes : #SonamGuptaनंतर आता #RashiBewafaHaiचा ‘Trend, यूझर्स म्हणतायत, सोनमची बहीण आहे काय?

Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.