बार्टीकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन थकले, आमरण उपोषण करण्याची वेळ

बार्टी, पुणेकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. (Aurangabad students said stipend not get from last five months)

बार्टीकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन थकले, आमरण उपोषण करण्याची वेळ
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 4:23 PM

औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे(बार्टी) यांच्याकडून विद्यावेतन दिलं जाते. औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विद्यार्थ्यावंर अभ्यास सोडून उपोषणाची वेळ आली आहे.(Aurangabad students said stipend not get from last five months)

एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या 5 महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. विद्यावेतनाचा प्रश्न सोडवा यासाठी विद्यार्थ्यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन त्वरीत मिळावे यासाठी आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कोरोनामुळं अभ्यासात व्यत्यय

मार्च महिन्यात कोरोनामुळं लॉकडाऊन करण्यात आले. याचाही फटका विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बसला. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमधून सावरुन पुन्हा अभ्यासाच्या तयारीला लागत असतानाच विद्यावेतनाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्यानं विद्यार्थ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.(Aurangabad students said stipend not get from last five months)

राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार लांबणीवर

कोरोना विषाणू ससंर्गामुळे 26 एप्रिल ते 10 मे रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर 11 ऑक्टोबरला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, MPSC परीक्षा नियोजित वेळेनुसारच घ्या, अशी मागणी राज्यातील ओबीसी नेत्यांनी केली होती. मात्र, त्यांचा विरोध डावलून 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षा पुढे ढकलून अन्य समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का? असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होती.

संबंधित बातम्या : 

Corona Effect | एमपीएससी स्पर्धा परीक्षेला अनिश्चित काळासाठी स्थगिती

नोव्हेंबरमधील MPSC परीक्षाही पुढे ढकला, विनायक मेटेंची मागणी

(Aurangabad students said stipend not get from last five months)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.