AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद होणार जर्मनीतील इंगोलस्टॅटची Tween City! प्रशासक आणि इंगोलस्टॅटच्या महापौरांमध्ये करार

औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट या दोन शहरांदरम्यान शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील. शहरांमध्ये स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल.

Aurangabad | औरंगाबाद होणार जर्मनीतील इंगोलस्टॅटची Tween City! प्रशासक आणि इंगोलस्टॅटच्या महापौरांमध्ये करार
औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट शहरांदरम्यान महत्त्वाचा करार
| Updated on: Apr 10, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबाद: जगप्रसिद्ध ऑडी कारचे उगमस्थान असलेले जर्मनीतील इंगोलस्टॅट (Ingolstat) आणि औरंगाबाद शहर आता सिस्टर सिटी (Sister city) म्हणून भविष्यात काम करणार आहेत. यांसदर्भातील सामंजस्य करार नुकताच करण्यात आलाय या करारामुळे दोन्ही शहरात औद्योगिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापार, पर्यटन क्षेत्रात आदानप्रदान होणार असल्याचे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. औरंगाबादकडून मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय आणि इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यातर्फे गेल्या वर्षभरापासून जर्मनी मधील इंगोलस्टॅट शहरसोबत ट्वीन सिटी अग्रीमेंट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी द्वारे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ, उपमहापौर डॉ. दोरोथे डेनेके, इंगोलस्टॅटचे शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख गॅब्रीएल एंजर्ट, सांस्कृतिक विभागाच्या क्रिस्टिना दिएडरीच, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या विभाग प्रमुख ब्रिगीट स्टॉकल, मेलानी कुनेल, म्युनिक जर्मनीसाठी भारताचे कौन्सिल कौन्सिलेट जर्नल डॉ. सुयश चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, ऑरीकचे व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक उपस्थित होते.

करारामुळे औरंगाबादचा काय फायदा?

या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटचे संबंध वृध्दिंगत होतील. भारत आणि जर्मनी, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्या संबंधांवर देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट या दोन शहरांदरम्यान शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील. शहरांमध्ये स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल. जोपर्यंत दोन्ही शहरांचा प्रतिसाद मिळत राहील, तोपर्यंत हा करार अबाधित असेल. या कराराला कुठलीही कालमर्यादा नाही, असे श्री पाण्डेय म्हणाले.

इंगोलस्टॅटचे महापौर काय म्हणाले?

इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ यांनी या भागीदारी बद्दल मत व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यांच्या शहराबद्दल माहिती देत औरंगाबादसोबत शहरासोबत भागिदारी करण्यास प्रोत्साहन दिले. या करारामुळे दोन शहरातील शाळा, महाविद्यालये भागिदारी करून स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम सारख्या संकल्पना राबवू शकतील. लवकरच यावर काम करू, असे देखील ते यावेळी म्हणाले. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या करारासाठी दोन्ही शहरांना शुभेच्छा देत हा करार शहरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सांगितले. या करारामुळे दोन्ही शहरांत संकल्पनांची देवाणघेवाण होईल, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, शहराचा विकास होईल आणि नागरिकांना नव्या कल्पना आणि नवे अनुभव मिळतील असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी इंगोलस्टॅटच्या टीमला औरंगाबादला येण्याचे आमंत्रणदेखील दिले. मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. सुयश चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन शहरांना जोडणे शक्य झाले. गेल्या वर्षभापासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे हा करार पुढे ढकलला गेला. आज अथक प्रयत्नांनंतर या करारावर दोन्ही शहरांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त आणि स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटी चे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनिकर, सीआयआय चे राज्य अध्यक्ष श्रीराम नारायणन, सी एम आय ए चे प्रमुख शिवप्रसाद जाजू, मसिआचे प्रमुख मनीष अगरवाल, माजी सीआयआयचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी, धूत हॉस्पिटलचे मुख्यप्रशासक हिमांशू गुप्ता, औरंगाबाद स्मार्ट सिटीची टीम यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Health Care : जिरे, काळे मीठ आणि ओवा यांचे मिश्रण आरोग्याच्या या समस्या दूर करते, वाचा सविस्तर!

Chanakya Niti in Marathi | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर यश तुमचेच असेल

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.