मुंबई : कोरोनाची लस दिली आणि रुग्ण एड्स पॉझिटिव्ह झाला, हे वक्तव्य काहीसं अजब वाटू शकतं, मात्र ऑस्ट्रेलियात हे घडलं आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना लस विकसित केली जात होती. मात्र सध्या त्याचे परीक्षण थांबवण्यात आलं आहे. याला एड्सची लक्षणं कारण ठरलं आहे. ज्या लोकांना ही कोरोनाची लस दिली गेली. त्यांच्यामध्ये एड्सची लक्षणं विकसित झाली. तब्बल 216 लोकांना ही कोरोना लस दिली गेली. मात्र, जेव्हा या लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात हे सर्वजण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. (Australia End COVID-19 Vaccine Trials Due HIV Antibody Positive)
आता तुम्ही म्हणाल चाचणीत भाग घेतलेले सर्व नागरिक एचआयव्ही पॉझिटीव्ह झाले का? तर नाही. कोरोनाची ही लस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये अशा काही अॅन्टीबॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांचे एड्सचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्यास सुरुवात झाली. मात्र त्या लोकांना एचआयव्ही एड्स झालेला नव्हता. कोरोना लसीमुळं हे परिणाम दिसत होते.
ऑस्ट्रेलियातील क्विंसलँड विश्वविद्यालय आणि सीएसएल ही बायोटेक कंपनी मिळून ही लस विकसित करत होते. ही लस परिणामकारक असल्याचं पहिल्या काही निरीक्षणांमध्ये दिसलं होतं. हे पाहता ऑस्ट्रेलिया सरकारनं या कंपनीसोबत लसीसाठी करारही केला होता. मात्र, आता लसीमुळे एड्स चाचण्या पॉझिटिव्ह येऊ लागल्या आहेत. त्यामुळे लसीच्या क्लिनिकल ट्रायल थांबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडूनही लसीचं परीक्षण थांबवण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात अत्यंत सावधपणे काम केलं जात आहे. नागरिकांच्या जीवाची काळजी सरकारला आहे. त्यामुळे 100 टक्के सुरक्षित आणि कोरोनावर परिणामकारक लस येईपर्यंत वाट पाहिली जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.(Australia End COVID-19 Vaccine Trials Due HIV Antibody Positive)
संबंधित बातम्या :
कोरोना : गरीब देशामधील 90 टक्के लोक लसीकरणापासून ‘या’ कारणामुळे वंचित राहणार
ब्रिटननंतर कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी