दक्षिणेचे त्रिदेव उत्तरेतील अयोध्या वाद सोडवणार!
मुंबई: अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापून, तीन जणांची नावं सुचवली आहेत. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तीनही मध्यस्थ दक्षिणेकडील तामिळनाडूचे आहेत. दक्षिणेचे त्रिदेव आता उत्तरेतील अयोध्येचा […]
मुंबई: अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापून, तीन जणांची नावं सुचवली आहेत. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तीनही मध्यस्थ दक्षिणेकडील तामिळनाडूचे आहेत. दक्षिणेचे त्रिदेव आता उत्तरेतील अयोध्येचा मोठा वाद सोडवणार आहेत.
निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलिफुल्ला (Fakkir Mohamed Ibrahim Kalifulla)
- फकीर मोहम्मद इब्राहिम खलिफुल्ला हे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत.
- न्यायमूर्ती खलिफुल्ला यांचा जन्म 23 जुलै 1951 रोजी तामिळनाडूतील सिवगंगाई जिल्ह्यातील करैकुडी इथं झाला.
- न्यायमूर्ती खलिफुल्ला यांनी 20 ऑगस्ट 1975 रोजी वकिलीला सुरुवात केली.
- कामगार कायद्याबाबत त्यांनी सुरुवातीची प्रॅक्टिस केली.
- 2 मार्च 2000 रोजी त्यांची मद्रास उच्च न्यायालायाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली.
- फेब्रुवारी 2011 मध्ये न्यायमूर्ती खलिफुल्ला यांची जम्मू काश्मीर हायकोर्टचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पुढील दोन महिने कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं.
- सप्टेंबर 2011 मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
- 2 एप्रिल 2012 रोजी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांनी त्यांना शपथ दिली.
- 22 जुलै 2016 रोजी न्यायमूर्ती खलिफुल्ला सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले.
श्री श्री रवीशंकर (sri sri ravi shankar)
- श्री श्री रवीशंकर हे आधात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात
- श्री श्रींनी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून आध्यात्माचं काम सुरु केलं
- जागतिक स्तरावर मानवातावादी धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख आहे
- 1956 मध्ये तामिळनाडूत जन्मलेल्या रवीशंकर यांचा भारत सरकारने 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलं आहे.
- यापूर्वी 2017 मध्ये रविशंकर आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांची राम मंदिराबाबत चर्चा झाली होती.
ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू (Senior Advocate Sriram Panchu)
- ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे सुद्धा तामिळनाडूचेच आहेत.
- 69 वर्षीय श्रीराम पांचू हे प्रतिष्ठित मध्यस्थ म्हणून ओळखले जातात.
- मीडिटेशन चेंबर्स अर्थात मध्यस्थ मंडळाचे ते संस्थापक आहेत.
- देशातील अग्रगण्य मध्यस्थांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे
- श्रीराम पांचू यांनी 2005 मध्ये भारतातील पहिलं कोर्ट-संलग्न मध्यस्थी केंद्र स्थापन केलं होतं
- श्रीराम पांचू यांनी मध्यस्थी या विषयावर दोन पुस्तकं लिहिली आहेत.
- अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांची प्रतिष्ठित मध्यस्थ, म्हणून नेमणूक केली आहे.
संबंधित बातम्या