Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

| Updated on: Sep 30, 2020 | 12:51 PM

बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाचा निकाल तब्बल 28 वर्षांनी आला आहे. (Babri Masjid Demolition Case Verdict LIVE UPDATE)

Babri  Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त
Follow us on

नवी दिल्ली : बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाचा निकाल तब्बल 28 वर्षांनी आला आहे. 1 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला. याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले. बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असं कोर्टाने नमूद केलं.(Babri Masjid Demolition Case Verdict) 

तसेच या मोठ्या राजकीय नेत्यांनी ही हिंसा रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. “विहिंप नेते अशोक सिंघल यांच्याविरुद्ध पुरावा नाही. फोटो, व्हिडीओ, फोटोकॉपीमध्ये ज्या पद्धतीने पुरावे देण्यात आले आहेत, त्यावरुन काहीही सिद्ध होत नाही”, असेही न्यायाधीश एस.के. यादव यांनी सांगितले. 

बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयाने आज (बुधवारी 30 सप्टेंबर) निकाल दिला. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी होते. लखनौमधील कोर्टात सकाळी 11 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात झाली. जवळपास दीड तासांनी म्हणजे 12.30 वाजता या घटनेचा निकाल आला. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते. (Babri Masjid Demolition Case Verdict LIVE UPDATE)

?LIVE UPDATE?

  • उत्तर प्रदेशातील लखनौमधील विशेष सीबीआय कोर्टाने बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत कोर्टाने मांडले.


[svt-event title=”सर्व आरोपी निर्दोष – न्यायधीश ” date=”30/09/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली : न्यायाधीश [/svt-event]

  • बाबरी खटल्यातील आरोपी विनय कटियार, ऋतंभरा, साक्षी महाराज, जय भगवान गोयल लखनौ कोर्टात पोहोचले आहे. तर दुसरीकडे लालकृष्ण आडवाणी यांचे वकील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.
  • बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयात निकाल देणारे न्यायधीश सुरेंद्र कुमार यादव कोर्टात पोहोचले आहे. ते 11 वाजता निकालाचे वाचन करतील. त्यापूर्वी कोर्टात 32 आरोपींमधील कोण-कोण व्यक्ती प्रत्यक्ष कोर्टात हजर असेल आणि कोण या ठिकाणी येणार नाही हे सांगण्यात येईल.

[svt-event title=”मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी” date=”30/09/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] या प्रकरणी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादूर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर हे सर्वजण आरोपी आहेत. [/svt-event]

[svt-event title=”आरोपींना 5 वर्षांची शिक्षा” date=”30/09/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास, आरोपींना जास्तीत 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते [/svt-event]

[svt-event title=”एकूण 48 आरोपी, त्यातील 17 जणांचे निधन” date=”30/09/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे [/svt-event]

[svt-event title=”निकाल देणारे न्यायधीश आज निवृत्त होणार” date=”30/09/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयात निकाल दिला जाणार आहे. हा निकाल देणारे न्यायधीश सुरेंद्र कुमार आज निवृत्त होणार आहे. या प्रकरणातील सुनावणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.  [/svt-event]

[svt-event title=”कोर्टाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ” date=”30/09/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] लखनौमध्ये बाबरी खटल्यावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात जवळपास दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तर संवेदनशील जिल्ह्यात आरपीएफ तैनात करण्यात आली आहे.   [/svt-event]

27 वर्षांपासून सुरू होता खटला, 17 आरोपींचा मृत्यू

बाबरी खटल्यावर मागच्या तीन वर्षांपासून सलग सुरु असलेला युक्तीवाद 1 सप्टेंबरला संपला. न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्यावर बुधवारी (24 सप्टेंबर) निकाल देणार आहेत. या खटल्यात भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 5 ऑक्टोबर 1993 ला तपास करुन या सर्व 49 आरोपींवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं होतं. (Babri Masjid Demolition Case Verdict LIVE UPDATE)

संबंधित बातम्या :

बाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश

Saamana Editorial : “बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान”, सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

Ayodhya Ram Mandir | बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना