Bachchan Family Corona: जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन
बच्चन कुटुंबातील जवळपास 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे (Bachchan Corona 56 people home quarantine ).
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील जवळपास 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे (Bachchan Corona 56 people home quarantine ). बच्चन कुटूंबातील चौघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. सध्या जनक आणि जलसा येथे 28 जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने रविवारीच (12 जुलै) ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे बच्चन कुटुंबाचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. चारही बंगल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांमधील सुमारे 30 कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यापैकी बऱ्याच जणांचे कोरोना अहवाल आज दुपारी येणार आहेत. दरम्यान, बीग बी यांनी रात्री ट्विट करुन आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या बच्चन हिलाही कोरोनाची लागण झाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona positive). दुसरीकडे बिग बी यांच्या पत्नी, खासदार जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan report corona positive).
संबंधित बातम्या :
Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग
Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना
Bachchan Corona 56 people home quarantine