आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल
शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.
अमरावती : “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही(Bachchu Kadu Criticize Mahavikas Aghadi Government). राज्याती ल कृषी खातं झोपलं आहे की काय”, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिली आहे (Bachchu Kadu Criticize Mahavikas Aghadi Government).
विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.
“ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे”, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
“राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय” असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बादhttps://t.co/P2ZjLPuiB6
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
Bachchu Kadu Criticize Mahavikas Aghadi Government
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत मका, बाजरी, कापूस, तुरीवर नाकतोड्याची धाड
Silk Farming | जय-विरुची जोडी, शेतात राबली, संकटकाळात रेशीम शेतीतून लाखो कमावले
मॅजिक नाही तर लॉजिक, नोकरीनंतर शेतकऱ्याची सेकंड इनिंग, खजूर शेतीतून 8 लाखाचं उत्पन्न