नव्या अवतारात बजाजची ‘कडक CT100’ लाँच, 1 लीटर पेट्रोलमध्ये 90 किलोमीटर धावणार

जास्तीत जास्त मायलेज आणि दमदार परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवून बाईक खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी बजाजने दमदार बाईक लाँच केली आहे.

नव्या अवतारात बजाजची 'कडक CT100' लाँच, 1 लीटर पेट्रोलमध्ये 90 किलोमीटर धावणार
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 2:55 PM

मुंबई : जास्तीत जास्त मायलेज आणि दमदार परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवून बाईक खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी बजाजने दमदार बाईक लाँच केली आहे. Bajaj Auto ने त्यांची जुनी CT100 बाईक अपग्रेड करुन ‘कडक CT100’ या नावाने लाँच केली आहे. बजाज ऑटोने दावा केला आहे की, ही बाईक 90 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची किंमतदेखील कमी आहे. (Bajaj Kadak CT100 launched with 8 new feature upgrades)

कडक CT100 की किंमत आणि फिचर्स

100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

मजबूत इंजिन

कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.

बाईकच्या फ्रंट फोर्क सस्पेंशन बेलोजमुळे या बाईकला अधिक कडक आणि स्टायलिश लुक मिळाला आहे. क्रॉस ट्यूबसह हँडलबारमुळे बाईकला अधिक स्थिरता मिळते. नवीन CT100 बाईकची सीट पूर्वीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे खराब रस्त्यांवर आरामात प्रवास करता येईल.

संबंधित बातम्या

सणासुदीच्या दिवसांमध्ये Hero Super Splendor घरी आणा, कंपनीकडून तीन मोठ्या ऑफर्स

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Festival Offer : हीरोच्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त…

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

(Bajaj Kadak CT100 launched with 8 new feature upgrades)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.