उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं, बीडच्या शेतकऱ्याचं कर्ज काही तासात माफ

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमधील सभेत त्यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलावलं, ज्याचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला कर्जमाफीचं पत्र देण्यात आलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावल्यानंतर काही तासातच या शेतकऱ्याचं कर्ज बँकेकडून माफ करण्यात आलं. राज्य सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. […]

उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं, बीडच्या शेतकऱ्याचं कर्ज काही तासात माफ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमधील सभेत त्यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलावलं, ज्याचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला कर्जमाफीचं पत्र देण्यात आलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावल्यानंतर काही तासातच या शेतकऱ्याचं कर्ज बँकेकडून माफ करण्यात आलं.

राज्य सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. उद्धव ठाकरेंनी या कर्जमाफीचा समाचार घेत, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा वाटपही करण्यात आलंय.

उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावताच बँक खडबडून जागी झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी यानंतर काही वेळातच बाळासाहेब हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याला फोन केला आणि तुमचं कर्ज माफ झालंय असं सांगितलं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बँकाच टाळाटाळ करतात का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, सहकार मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, काही महिने अगोदरच या शेतकऱ्याची रक्कम बँकेकडे जमा करण्यात आली आहे.

सहकारमंत्र्यांचं स्पष्टीकरण

“उद्धव ठाकरेजी यांनी बीडच्या सभेत ज्या शेतकर्‍याला उभे केले होते, त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत,” असं स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून देण्यात आलंय. त्यामुळे बँकांच्या विलंबामुळेच शेतकऱ्यांना अजून पैशांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं समोर आलंय.

बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. 2014 मध्ये त्यांनी कर्ज घेतल्यानंतर हे खातं एनपीए झालं. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले. त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. सरकारकडून ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे, असंही सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.