अनेक गौप्यस्फोटांची मालिका, बराक ओबामांच्या पुस्तकाला विक्रमी मागणी, पहिल्या दिवसाचा खप…..

बराक ओबामांचे पुस्तक 'अ प्रॉमिस्ड लँड' बाजारात येताच पहिल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे.(Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)

अनेक गौप्यस्फोटांची मालिका, बराक ओबामांच्या पुस्तकाला विक्रमी मागणी, पहिल्या दिवसाचा खप.....
Barack Obama
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:16 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा ( Barack Obama) यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकानं आणखी एक विक्रम केला आहे.  अनेक गौप्यस्फोट करणारे ओबामांचे पुस्तक बाजारात येताच पहिल्या 24 तासात 8 लाख 90 हजार प्रतींची विक्री झाली आहे. आधुनिक काळात अध्यक्षपदाच्या अनुभववावर आधारित पुस्तकाला इतक्या मोठ्या प्रमाण पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला आहे. (Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)

बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘पेंग्विन रँडम हाऊस’ या संस्थेने केले आहे. 8 लाख 90 हजार प्रतींमध्ये प्रत्यक्ष बुकिंग, ई-बुक, ऑडिओ बुक अशा प्रकारचा आवृत्तींचा समावेश आहे.

पेंग्विन रँडम हाऊसचे डेविड ड्रेक यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाच्या पहिल्या दिवसातील विक्रीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या विक्रीतून लोकांना माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती हे दर्शवते, असे डेविड ड्रेक म्हणाले. (Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)

ऑनलाईन साईटसवर जोरदार विक्री

अ‌ॅमेझॉन आणि बार्न्स अँड नोबल या ऑनलाईन विक्री करणाऱ्या साईटसवर देखील पुस्तकाची जोरदार विक्री होत आहे. बार्न्स अँड नोबल यांच्याद्वारे पहिल्या दिवशी 50 हजार प्रतींची विक्री झाली होती. बार्न्स अँड नोबल कंपनीचे सीईओ जेम्स डोंट यांनी 10 लाख प्रतींची विक्री होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची किंमत 45 अमेरिकी डॉलर आहे. रुपयांमध्ये याची किंमत 3300 रुपये होते. ओबामांनी या पुस्तकात 2008 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते 2016 मधील कारकिर्दीच्या शेवटपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. ओबामांचे पुस्तक दोन भागामध्ये प्रकाशित होणार आहे. त्यातील पहिला भाग मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे.

भारतात पुस्तकाची चर्चा

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा समावेश आहे. ओबामा यांनी मनमोहन सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांचे वर्णन ‘ निर्विकार प्रामाणिकपणा असलेली व्यक्ती’ असे केले आहे.

राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी बराक ओबामा यांनी पुस्तकात केली आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात, असं ओबामांनी पुस्तकात नमूद केले आहे. यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणार हा प्रश्न मला पडला होता: ओबामा

(Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)

भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.