तीन दिवसाची कोठडी, 500 रुपये दंड, न्यायालयाकडून लॉकडाऊन न पाळणाऱ्यांना शिक्षा
लॉकडाऊन न पाळणाऱ्या तिघांना तीन दिवसांची कोठडी किंवा 500 रुपये दंड ठोठावण्यात आला (Police action on people baramati) आहे.
बारामती : लॉकडाऊन न पाळणाऱ्या तिघांना तीन दिवसांची कोठडी किंवा 500 रुपये दंड ठोठावण्यात आला (Police action on people baramati) आहे. बारामतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काल (1 एप्रिल) ही शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ठोठावल्याने पुणे शहरात सध्या एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी फिरणाऱ्यांवर 188 कलमानुसार गुन्हे (Police action on people baramati) दाखल केले होते.
बारामती शहर आणि तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात फिरुन नियमांचं उल्लंघण करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली होती. काल यातील अफजल बनीमिया आतार, चंद्रकुमार जयमंगल शहा आणि अक्षय चंद्रकांत शहा या तिघांना बारामती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 3 दिवस साधी कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलत रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली होती. बारामती शहर आणि तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. काल बारामती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बारामथमधील तिघांना शिक्षा ठोठावत चांगलाच दणका दिला आहे.
न्यायालयाकडून सुनावलेली शिक्षा जरी कमी असली तरी त्याचे परिणाम भविष्यात संबंधिताच्या शिक्षण, नोकरी किंवा तत्सम क्षेत्रातील कामावर याचे परिणाम होणार आहे, असं पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे पोलिसांनी लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अनेकांवर गुन्हे दाखल करत कठोर कारवाई केली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्यामुळे पोलीस कारवाई करत आहेत.