पाकिस्तानकडून लष्कर आणि जनतेला सतर्कतेचे आदेश, बदला घेण्याची भाषा
नवी दिल्ली : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आता कांगावा सुरु केलाय. भारताला उत्तर देण्याची भाषा करत पाकिस्तानने त्यांची जनता आणि लष्कराला सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा प्रमुख मंत्र्यांनी बैठक झाली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. बैठकीनंतर पाकिस्तानकडून पत्रकार […]
नवी दिल्ली : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आता कांगावा सुरु केलाय. भारताला उत्तर देण्याची भाषा करत पाकिस्तानने त्यांची जनता आणि लष्कराला सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा प्रमुख मंत्र्यांनी बैठक झाली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
बैठकीनंतर पाकिस्तानकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. भारताने हल्ला केलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मीडियाला नेऊन घटनेची स्थिती दाखवली जाईल, असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. शिवाय भारताने मोठ्या प्रमाणात नुकसान करत दहशतवादी मारले असल्याचा दावा खोटा असल्याचंही पाकिस्तानने म्हटलंय.
भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत सीमा ओलांडली. जागा आणि स्थळ निवडून याचं उत्तर दिलं जाईल, असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. इम्रान खानने 27 फेब्रुवारीला नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली आहे. लष्कर आणि जनतेने सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार रहावं, असं आवाहन पाकिस्तान सरकारने केलंय.
भारताकडून असं काही तरी केलं जाईल हे आम्ही सातत्याने सांगत होतो. अखेर त्यांनी आज हे केलंच. पाकिस्तानला स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही पाकिस्तानने म्हटलंय.
भारताकडून पुलवामा हल्ल्याचा बदला
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला.
व्हिडीओ पाहा :