बीडमध्ये शिवसेना युवा प्रमुखावर तलवारीने हल्ला

शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील सारडा नगरी परिसरात गुरुवारी (16 जानेवारी) दिवसा ढवळ्या हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली.

बीडमध्ये शिवसेना युवा प्रमुखावर तलवारीने हल्ला
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 4:14 PM

बीड : शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला (Attack On Yuvasena President). शहरातील सारडा नगरी परिसरात गुरुवारी (16 जानेवारी) दिवसा ढवळ्या हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ला झाल्यानंतर फरताळे यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान राहुल फरताळे यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Attack On Yuvasena President).

राहुल फरताळे हे त्यांच्या घराकडून शहरात येत होते. तेव्हा सावता माळी चौकाच्यापुढे आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी राहुल फरताळे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि कुकरी ने थेट हल्ला चढवला. हे अवघ्या काही क्षणांत झाल्याने नेमकं काय घडतंय हेच राहुल फरताळे यांना कळालं नाही. हल्लेखोर हल्ला करत असताना राहुल यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. राहुल यांना आरडाओरड करताना पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. राहुल फरताळे यांचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

हल्लेखोरांमध्ये खंडू जगताप आणि दादाराव जगताप यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वी जगताप आणि फरताळे यांच्यात वाद झाला होता. कदाचित त्याच वादातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्राणघातक हल्ल्यात राहुल फरताळे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Attack On Yuvasena President

व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.