बीडमध्ये शेतीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी, काठीने मारहाण, तिघे गंभीर जखमी

पीडित कुटुंबाच्या नावे असलेली जमीन बळकावत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला.

बीडमध्ये शेतीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी, काठीने मारहाण, तिघे गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 10:36 PM

बीड : बीडच्या अंबाजोगाई इथल्या आपेगाव (Beed Free Style) शिवारात शेतीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यासर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी विव्हळत असताना देखील काठीने मारहाण सुरु होती. या घटनेत तिघे जण गंभीररित्या जखमी झाले, असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत (Beed Free Style).

पीडित कुटुंबाच्या नावे असलेली जमीन बळकावत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला. बीडमध्ये गेल्या काही दिवसात शेतीच्या वादातून मारहाणीच्या घटना वाढत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

जिल्ह्यात रोजच कुठे ना कुठे पोलीस ठाण्यात जमिनीचा वादाच्या घटनेची नोंद होत आहे. अशा घटना नोंद होऊन देखील पोलीस अधीक्षक किंवा महसूल प्रशासनाचे अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे, अशी चर्चा आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे की, काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कदाचित प्रशसनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा घटनांमध्ये अनेकांचे जीव जात आहेत. तरीही प्रशासन हे गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा आहे (Beed Free Style).

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेला तिहेरी हत्याकांडाची वासनवाडी येथील घटना असो, की मांगवडगाव येथील झालेला तिहेरी खूनाची घटना असो. या सर्व घटना शेतीच्या वादातूनच घडल्या असून शेतामुळे स्वतःसह अनेकांचा जीव पणाला लावला जात आहे.

पोलीस दप्तरी जमिनीचा वाद नोंद होऊनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहेत, पोलीस प्रशासन करतंय तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मानवी जीव हा जमीन आणि पैशांपेक्षा स्वस्त झाला आहे का? हाच प्रश्न अनेकांच्या मनाला भेदत असताना पुन्हा बीडच्या अंबाजोगाई इथल्या आपेगाव शिवारात शेतीच्या वादातून दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. मात्र, पोलीस प्रशासनातील अधीकारी-कर्मचारी हे आपल्या स्वार्थासाठी अशा विवादित प्रकरणात शक्यतो आपल्या स्तरावर तडजोड करुन रफादफा करण्याचा प्रयत्न करत असल्यानेच अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे (Beed Free Style).

संबंधित बातम्या :

मंतरलेले लिंबू आणि कुंकू दिल्याने 20 जणांना कोरोना, लातूरमधील धक्कादायक घटना

‘मी असं बोललोच नाही’, तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.