Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed | ग्रामीण विद्यार्थी, शेतकऱ्यांचा ‘देव’ बुडाला? शोधणारा जवानही बेपत्ता, जिल्हाधिकारी धरणात उतरले, काय घडतंय बीडमध्ये?

डॉ. दत्ता फपाळ यांचं खासगी रुग्णालय तेलगाव येथे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांवर ते सवलतीच्या दरात उपचार करत होते. परिसरातील अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे त्यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते.

Beed | ग्रामीण विद्यार्थी, शेतकऱ्यांचा 'देव' बुडाला? शोधणारा जवानही बेपत्ता, जिल्हाधिकारी धरणात उतरले, काय घडतंय बीडमध्ये?
डावीकडे डॉ. फपाळ, उजवीकडे पाहणीसाठी निघालेले बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 2:52 PM

बीडः जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) येथील शेकडो ग्रामीण विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे देव मानले जाणारे डॉ. फपाळ (Dr.Dattatray Fapal) आज सकाळीच अचानक बेपत्ता झालेत. 24 तास उलटून गेल्यानंतरही त्यांना शोधण्यात अग्निशमक दलाला (Fire Brigade) यश आलेले नाही. आणखी गंभीर बाब म्हणजे डॉ. फपाळ यांना शोधण्यासाठी गेलेल्या दोन जवानांपैकी एक जवानही बेपत्ता आहे. मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यात अडकून जवानाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या डॉक्टरांबाबत अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण माजलगाव हादरलंय. रविवारी दुपारपासून घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी झाली आहे. डॉक्टर फपाळ असे एकाएकी पोहोण्यासाठी गेलेच कसे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. यामागे काही घातपात असावा का, अशी शंकाही उपस्थिती केली जातेय. दरम्यान, ही गंभीर स्थिती पाहता, बीडचे जिल्हाधिकारीदेखील स्वतः धरणात उतरून पाहणी करत आहेत.

काय काय घडलं?

  • माजलगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर दत्ता फपाळ हे रविवारी सकाळी धरणात पोहोण्यासाठी गेले होते.
  • जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पोहण्यासाठी या परिसरात बंदी असताना डॉक्टर येथे गेलेच कसे हा प्रश्न उपस्थित होतोय.
  • तसेच त्यांच्यासोबत आणखी कोण होतं याचीही माहिती समोर आलेली नाही.
  •  डॉ. फपाळ यांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं.
  •  या पथकातील कर्मचारी राजू मोरे हेदेखील मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  •  बचाव कार्यासाठी जवान ऑक्सिजन सिलिंडर घेऊन पाण्यात उतरले होते.
  •  मच्छिमारांच्या जाळ्यात ते अडकल्याने फक्त ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आल्याचे प्रथमदर्शनी म्हटले जात आहे.
  •  दर दुसऱ्या एका जवानाला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
  •  डॉ. फपाळ यांना शोधण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
  • आज माजलगाव येथील धरणात स्वतः बीडचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
  • डॉ. दत्ता फपाळ यांचं खासगी रुग्णालय तेलगाव येथे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांवर ते सवलतीच्या दरात उपचार करत होते.
  • परिसरातील अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे त्यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.