पोलिसाच्या हाती फावडं, स्वतःच खड्डे बुजवले

अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये म्हणून बीडमध्ये श्रीकांत डोंगरे या पोलिस अधिकाऱ्याने चक्क हातात फावडे घेतले

पोलिसाच्या हाती फावडं, स्वतःच खड्डे बुजवले
Follow us
| Updated on: Nov 17, 2019 | 1:01 PM

बीड : ‘रस्ते कमी आणि खड्डे जास्त’ या परिस्थितीमुळे राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खाकी वर्दी पुढे सरसावली. बीडमध्ये चक्क एका पोलिसानेच हाती फावडं (Police Extinguish Potholes) घेऊन खड्डे बुजवले.

परळी-सिरसाळा रोडवर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार देऊनही कसलीच हालचाल दिसत नाही. परिणामी खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये म्हणून श्रीकांत डोंगरे या पोलिस अधिकाऱ्याने चक्क हातात फावडे घेऊन सिमेंट आणि काँक्रिटने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले. पोलिसांचा खड्डे बुजवण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

एरवी गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणारे पोलिस अपघात रोखण्यासाठी अशाप्रकारे हातभार लावताना पाहून बीड पोलिसांचे नेटकऱ्यांकडून कौतुक (Police Extinguish Potholes) होत आहे.

गडकरींकडून खरडपट्टी

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर एसटी बस चिखलात रुतून बसल्याचा फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल झाला होता. याची तात्काळ दखल घेत 3 नोव्हेंबरला नितीन गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना फैलावर घेतलं होतं.

चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पाहून गडकरींनी कंत्राटदारांना झापलं

‘औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव मार्गाची दुर्दशा दाखवणारा फोटो माझ्या निदर्शनास आला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित मुख्य अभियंत्यांना यासंबंधी सूचना दिलेली आहे. पुढील आठ दिवसांत रस्त्याची स्थिती सुधारण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा, परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. हे स्वीकारार्ह नाही. अधिकारी किंवा कंत्राटदार, हलगर्जीबद्दल कोणालाही माफ केलं जाणार नाही’ असा इशाराच नितीन गडकरींनी दिला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.