केस मागे घ्या, अन्यथा तुमचाही सुमित वाघमारे करु, पीडित कुटुंबाला आरोपींच्या धमक्या

बीडमध्ये देखील पुन्हा एकदा पीडितेला संपवून टाकण्याच्या धमक्या मिळत असल्याने एकच खळबळ उडाली (sumit waghmare honor killing case) आहे.

केस मागे घ्या, अन्यथा तुमचाही सुमित वाघमारे करु, पीडित कुटुंबाला आरोपींच्या धमक्या
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 4:50 PM

बीड : बहिणीने प्रेमविवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार 2018 मध्ये बीडमध्ये घडला (sumit waghmare honor killing case) होता. यात सुमित शिवाजी वाघमारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्याकांडाला वर्ष उलटले असून सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मात्र आरोपींच्या नातेवाईकांकडून सुमितच्या कुटुंबियांना दबाव आणि धमक्या येत आहेत. “ही केस मागे घे, अन्यथा तुझाही सुमित करु,” अशी धमकी पीडित कुटुंबियांना दिली जात आहे. यामुळे सध्या वाघमारे कुटुंबिय दहशतीखाली आहे. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातून बीडमध्ये 18 डिसेंबर 2018 रोजी इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटार सायकलवरुन धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. तर भाग्यश्री जखमी झाली होती. या हत्याकांडानंतर राज्य हादरले होते.

या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे आरोपी सध्या कारागृहात आहेत. तर कृष्णा क्षीरसागर आणि गजानन क्षीरसागर या दोघांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या हत्याकांडानंतर भाग्यश्रीला पोलीस संरक्षण देण्यात आलं (sumit waghmare honor killing case) आहे.

मात्र वाघमारे कुटुंबातील सदस्यांना हे प्रकरण मिटवून घे, अन्यथा जगणं मुश्कील करु अशा धमक्या वारंवार येत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षणाची मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात येते आहे. तसेच या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी लांडगे कुटुंबाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. महाराष्ट्रात हळहळ ही व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच दोन आरोपींना जामीन मिळाला. तर दोन आरोपी अद्याप कोठडीतच आहेत. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाच आता आरोपीच्या कुटुंबाकडून केस मागे घे, अन्यथा तुलाही संपवू, अशा धमक्या येत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंब मोठ्या दहशतीत आहे. एकीकडे हिंगणघाटचा प्रकार समोर असताना दुसरीकडे बीडमध्ये देखील पुन्हा एकदा पीडितेला संपवून टाकण्याच्या धमक्या मिळत असल्याने एकच खळबळ उडाली (sumit waghmare honor killing case) आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.