बेस्टच निर्णय ! गणपती उत्सवात बेस्ट जादा फेऱ्या चालविणार, या मार्गांवर फेऱ्या
बेस्ट प्रशासन मुंबईत गणेश भक्तांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेस चालविणार आहे. या बसेस रात्रीच्या चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.या दिवसांत मुंबईत रात्री गणपती दर्शनासाठी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध रांगा लावत असतात. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबईची जीवनवाहीनी म्हटली जाणारी बेस्ट आता रात्री गणेशभक्तांच्या सोयीसाठी जादा बसेसचे नियोजन करणार आहे.या जादा बेस्ट फेऱ्या 7 ते 16 सप्टेंबर या काळात चालविण्याचे नियोजन आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे.या उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यकाळापासून समाज प्रबोधन देखील केले जात आले आहे.मुंबईतील गिरणगावात सार्वजनिक गणेशोत्सवात रात्रभर गणपती पाहाण्याची मजा काही औरच आहे.मोठमोठ्या आकर्षक गणेश मूर्ती आणि त्यांच्या सजावट पाहाण्यासाठी भाविक आणि पर्यटक रात्रभर फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी बेस्ट देखील कंबर कसली आहे.
असे असणार वेळापत्रक –
या बेस्ट मार्गांवर जादा बसेस धावणार
या वर्षी देखील बेस्ट 7 ते 16 सप्टेंबर 2024 या गणेशोत्सवाच्या काळात बेस्ट उपक्रमाने रात्रीच्या वेळेत 24 विशेष बस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दक्षिण मुंबईतून उत्तर – पश्चिम मुंबईकडे गिरगाव,लालबाग, परळ, चेंबूर मार्ग प्रवर्तित होणाऱ्या बस मार्ग क्रमांक 4 मर्यादित, 7 मर्यादित, 8 मर्यादित, ए-21 , ए-25, ए-42, 44, 66, 69 आणि सी-51 या बेस्ट मार्गांवर रात्रीच्या विशेष बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या मार्गांवर मागणीनूसार अतिरित्त बस देखील चालविण्यात येणार आहेत. भाविक आणि पर्यटकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.