भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, 25 वर्षीय तरुणीला अटक

भोपाळ (मध्य प्रदेश): आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyu Maharaj ) यांच्या आत्महत्येच्या तब्बल सात महिन्यानंतर, याप्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीसोबत तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये भय्यू महाराजांच्या दोन सहकाऱ्यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक हरिनारायणाचारी मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली. पलक, विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना […]

भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, 25 वर्षीय तरुणीला अटक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

भोपाळ (मध्य प्रदेश): आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyu Maharaj ) यांच्या आत्महत्येच्या तब्बल सात महिन्यानंतर, याप्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीसोबत तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये भय्यू महाराजांच्या दोन सहकाऱ्यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक हरिनारायणाचारी मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली. पलक, विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना याप्रकरणात अटक करण्यात आलं आहे. या तिघांवर 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणं) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमध्ये राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

25 वर्षीय पलकवर आरोप आहे की, ती भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन लग्नासाठी दबाव आणत होती. तर विनायक आणि शरद हे दोघेही त्या तरुणीला या कामात मदत करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणात भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आयुषी आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांनी या तीनही आरोपींविरोधात पोलिसांना काही दिवसांपूर्वीच जबाब नोंदवला होता.

महाराजांच्या पत्नीचा जबाब भय्यू महाराजांची पत्नी आयुषीने या तिघांवरही आरोप केले होते. षडयंत्र रचून या तिघांनी महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आयुषी यांनी केला होता. त्यानंतर दोन आरोपींना आधी अटक झाली होती, तर शुक्रवारी पलकला पोलीस स्टेशनला बोलवून अटक करण्यात आलं. त्यानंतर तिघांना कोर्टात हजर करुन, त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली.

महाराजांच्या विवाहादरम्यान पलकचा राडा ज्या पलक नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे, तिला मनमीत अरोरा नावाच्या व्यक्तीने भय्यू महाराजांची भेट घालून दिली होती. त्यानंतर विनायक आणि शरद देशमुखची मदत घेऊन पलकला महाराजांच्या जवळ पाठवण्यात येऊ लागलं. त्यामुळे महाराजांना ब्लॅकमेल करणं सोपं झालं. ज्यावेळ भय्यू महाराज दुसरं लग्न करत होते, त्यावेळी पलकने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांच्या घरी जाऊन राडा घातला होता. विनायक आणि शरद तिच्यासोबत होते.

पलकने महाराजांना दुसऱ्या लग्नानंनतर वर्षभराचा वेळ देऊन, 16 जूनला लग्नाची तारीख निश्चित करण्याचा दबाव टाकला होता. पलकच्या मोबाईलवरुन विनायक आणि शरदला मेसेज पाठवण्यात आला होता. त्यामध्ये आपला प्लॅन यशस्वी होणार की नाही? असं विचारण्यात आलं होतं. त्यानंतर महाराजांना अश्लिल मेसेजही पाठवण्यात आले होते, अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली.

विश्वासू सहकारी विनायक आत्महत्येच्या सहा महिन्यानंतर पोलिसांनी महाराजांचा ड्रायव्हर कैलास पाटीलला अटक केली. त्यानंतर दिवसेंदिवस भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा उलगडा करताना पोलिसांना अनेक धागेदोरे मिळत आहेत. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांचा विश्वासू सेवक होता‌. मात्र जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता. ड्रायव्हरला अटक केल्यानंतर त्याने विनायक दुधाळेचं नाव घेतलं होतं. कैलास पाटीलने महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे खंडणी आणि धमकावलं होतं. कैलास पाटीलने विनायक हा अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते.

तरुणीच्या मोबाईलमुळे पर्दाफाश महाराजांचे वकील निवेश बडजात्या यांना डिसेंबर महिन्यात 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं. याप्रकरणी महाराजांचा ड्रायव्हर कैलास पाटील आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. महाराजांना दोन साथीदार आणि एका युवतीद्वारे धमकावण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं.

तपासादरम्यान पोलिसांनी महाराजांचा मोबाईल जप्त केला होता. या मोबाईल्समध्ये तरुणीचं अश्लिल चॅटिंग मिळालं होतं. इतकंच नाही तर सेवक विनायक आणि शरद त्यांना ब्लॅकमेल करत होते, हे सुद्धा समोर आलं होतं.

संबंधित बातम्या

भय्यू महाराजांच्या विश्वासू सेवकाला बेड्या, विनायक कसा सापडला?  

भय्यूजी महाराजांना अश्लील सीडीने ब्लॅकमेल करणारी ‘ती’ कोण?  

भैय्यू महाराजांनी जानेवारीतच आत्महत्येचा प्रयत्न केला होता : सेवक  

तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या? 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.