तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या?

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच महाराजांची मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत. संशयित सेवक आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डीआयजींकडे करण्यात आलेल्या या मागणीनंतर संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कलम 164 अंतर्गत चालकाचा जबाब नोंदवून घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. काय आहे माय-लेकींची […]

तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच महाराजांची मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत. संशयित सेवक आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डीआयजींकडे करण्यात आलेल्या या मागणीनंतर संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कलम 164 अंतर्गत चालकाचा जबाब नोंदवून घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

काय आहे माय-लेकींची मागणी?

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या बंदुकीतून गोळी घालून आत्महत्या केली होती. भय्यू महाराजांची मुलगी आणि दुसरी पत्नी डॉ. आयुषी यांचं पटत नव्हतं. पण दोघी पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. महाराजांनी घरगुती कारणांमुळे आत्महत्या केली नाही. त्यांना घर, गाडी, बंगला आणि कोट्यवधी रुपयांच्या मागणीसाठी ब्लॅकमेल केलं जात होतं, याची चौकशी व्हायला हवी. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला चालक कैलास पाटील याच्याकडे सगळी माहिती आहे. सेवक विनायक, शरद देशमुख आणि तरुणीकडून रचण्यात आलेल्या कटाची सर्व माहिती त्याच्याकडे आहे, असं या मायलेकींनी म्हटलं आहे.

कलम 164 काय आहे?

कोर्टात जबाब हा कलम 164 अंतर्गतच नोंदवावा अशी स्पष्ट विनंती महाराजांची पत्नी आणि मुलीने केली आहे. कारण, पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानंतर साक्षीदार आपलं म्हणणं नंतर बदलतात. पण 164 अंतर्गत जबाब नोंदवल्यानंतर जबाब बदलला जाऊ शकत नाही. जबाब बदलल्यास शिक्षेचीही तरतूद आहे.

‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सेवक आणि निकटवर्तीयांनी एक कट रचून आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर येऊ दिलं नाही. पत्नी आणि मुलगी यांच्यातील कलहाला कंटाळून महाराजांनी आत्महत्या केल्याचं वृत्त पसरवण्यात आलं होतं. पण आता पहिल्यांदाच मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत.

पैशांसाठी ब्लॅकमेलिंग

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैलास पाटीलच्या माहितीनुसार, भय्यू महाराजांची आत्महत्या एक असामान्य घटना होती. त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. महाराजांची देखभाल करणाऱ्या एका तरुणीचा यामध्ये हात आहे. तिने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक अश्लील व्हिडीओ बनवला होता. डॉ. आयुषी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर या तरुणीचं येणंजाणं बंद झालं. हा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत तिने दर महिन्याला दीड लाख रुपये उकळणं सुरु केलं. ब्लॅकमेलिंगमध्ये जवळचे सेवकही सहभागी होते, असंही कैलास पाटीलचं म्हणणं आहे. पोलीस आता या सेवकांचा शोध घेत आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.