भारत बायोटेकची स्वदेशी ‘कोवॅक्स’ लस बाजारात कधी? डॉक्टर म्हणतात…
स्वदेशी कोरोना लस पाच ते सहा महिन्यात बाजारात येऊ शकते, असा अंदाज डॉक्टरांनी बोलून दाखवला

नागपूर : जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. नागपुरात स्वदेशी कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पाच ते सहा महिन्यात लस बाजारात येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Bharat Biotech Corona Vaccine Covaxin testing in Nagpur)
नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात 55 स्वयंसेवकांना भारत बायोटेकची ‘कोवॅक्स’ ही लस देऊन सात दिवस पूर्ण झाले. या सात दिवसात 55 स्वयंसेवकांपैकी कोणालाही कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती आहे.
पुढील एक दोन दिवसात या स्वयंसेवकांमध्ये किती अँटीबॉडीज वाढल्या, याची तपासणी होणार आहे. त्यानंतर सोमवारपासून याच स्वयंसेवकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार, अशी माहिती कोवॅक्सची मानवी चाचणी करणारे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.
लसीचे सकारात्मक परिणाम असल्याचा विश्वासही डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला. स्वदेशी कोरोना लस पाच ते सहा महिन्यात बाजारात येऊ शकते, असा अंदाज डॉक्टरांनी बोलून दाखवला
भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनाची पहिली लस तयार
भारत बायोटेक कंपनीने पहिल्यांदा कोरानाची लस तयार केली. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगीही मिळाली. त्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियेचा पहिला टप्पाही यशस्विरित्या पार पडला आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे
भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या लसीकडे लागून आहे.
VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूज | 9 AM | 6 August 2020 https://t.co/ZDUTJWmXG2
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2020
(Bharat Biotech Corona Vaccine Covaxin testing in Nagpur)