प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. कोण आहेत नानाजी देशमुख? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. शिवाय त्यांनी शिक्षण आणि आरोग्य […]
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे.
कोण आहेत नानाजी देशमुख?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. शिवाय त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही योगदान दिलं. भारतीय जन संघाचे ज्येष्ठ नेते असलेले नानाजी देशमुख यांचं निधन 27 फेब्रुवारी 2010 रोजी झालं. तर हिंगोली जिल्ह्यातील काडोलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. 1999 ते 2005 या काळात ते राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते.
प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी हे नानाजी देशमुख यांचं वाक्य होतं. महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये नानाजी देशमुख यांनी मोठं सामाजिक कार्य केलं. त्यांनी भारताच्या पहिल्या ग्रामीण विद्यापीठाचीही स्थापना केली. चित्रकुट ग्रामोद्योग विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून त्यांनी काम पाहिलं.
भूपेन हजारिका यांची कारकीर्दी
ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आलाय. भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममध्ये 8 सप्टेंबर 1926 रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. मृत्यूच्या सात वर्षानंतर त्यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला.
प्रणव मुखर्जी
भारतरत्नच्या यादीत भुवया उंचावणारं नाव माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आहे. प्रणव मुखर्जी यांनी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही काळासाठी ते काँग्रेसवर नाराजही होते, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 2004 साली काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान असतील, अशी चर्चा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2012 साली ते राष्ट्रपती झाले.