भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी मानले या दोन नेत्यांचे आभार, म्हणाले, माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित

| Updated on: Feb 03, 2024 | 11:26 PM

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वात मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. 96 वर्षीय अडवाणी यांनी स्वत: या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी मानले या दोन नेत्यांचे आभार, म्हणाले, माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित
LALKRUSHNA ADVANI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 3 फेब्रुवारी 2024 : अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाली आहे. रामलला येथे विराजमान आहे. याच राममंदिरसाठी आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हा पुरस्कार पूर्ण नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे.

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वात मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. 96 वर्षीय अडवाणी यांनी स्वत: या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

“आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नाही, तर त्या आदर्श आणि तत्वांचाही सन्मान आहे ज्याची मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

“मी वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सामील झालो तेव्हापासून माझी एकच इच्छा होती की आयुष्यात जे काही कार्य माझ्यावर सोपवण्यात आले आहे ते माझ्या प्रिय देशासाठी निस्वार्थपणे सेवा करून स्वत:ला समर्पित करावे. “इदम् न मम” हे ब्रीदवाक्य म्हणजे माझ्या आयुष्याला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. हे जीवन माझे नाही. माझे जीवन माझ्या राष्ट्रासाठी आहे.” अशा भावना लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्या आहेत.

अडवाणी यांनी मानले या दोन नेत्यांचे आभार

भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी पुरस्काराबद्दल दोन नेत्यांचे आभार मानले आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतोच. परंतु, माझ्या पक्षातील लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि ज्यांच्यासोबत मला सार्वजनिक जीवनात माझ्या संपूर्ण प्रवासात काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्यांचेही मी मनापासून आभार मानतो.” असे ते म्हणाले.

अडवाणी यांना झाली पत्नीची आठवण

मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषत: माझ्या प्रिय दिवंगत पत्नी कमला यांच्याबद्दल मनापासून भावना व्यक्त करतो. त्या माझ्या आयुष्यातील शक्ती आणि स्थिरतेचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत. आपला महान देश महानतेच्या आणि वैभवाच्या शिखरावर जावो’, अशी प्रार्थनाही अडवाणी यांनी या निवेदनात केली आहे.