भीमा पाटस कारखाना सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीचं जागरण गोंधळ

भीमा पाटस कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करावा, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी जागरण गोंधळ घालत आंदोलन केले.

भीमा पाटस कारखाना सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीचं जागरण गोंधळ
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 8:47 PM

दौंड (पुणे) : पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे भीमा पाटस. मात्र हाच कारखाना सध्या बंद आहे. त्यामुळे कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करावा, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी जागरण गोंधळ घालत आंदोलन केले. (Bhima patas Should Start Deflation Season Demand NCp Ramesh thorat)

यावर्षी कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करावा तसंच शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी द्यावीत, अशा मागण्या आंदोलनावेळी करण्यात आल्या. जागरण गोंधळ घालून कारखान्याच्या संचालक मंडळाला सुबुद्धी मिळावी यासाठी साकडं घालत असल्याचं रमेश थोरात यांनी सांगितलं.

भाजप आमदार राहुल कुल हे अध्यक्ष असलेल्या पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना सलग दुसऱ्या वर्षीही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी भीमा पाटस सहकारी कारखान्याला 36 कोटी रुपयांची मदत मिळूनही हंगाम सुरु केला जात नाही, सरकार तरी किती मदत करणार?, असा सवाल करत शेतकरी आणि कामगारांची देणी थकीत असतानाही कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्यानं हे आंदोलन केल्याचं माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितलं.

रमेश थोरात म्हणाले, “इतके पैसे सरकारकडून मिळून देखील आपण कारखाना बंद का ठेवतोय, त्याचं उत्तर कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि अध्यक्षांनी द्यावं. आपण शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कारखाना चालू केला पाहिजे, अशी सबुद्धी त्यांना मिळावी, म्हणून आज हे जागरण गोंधळ आंदोलन करण्यास आलं.”

(Bhima patas Should Start Deflation Season Demand NCp Ramesh thorat)

संबंधित बातम्या

Corona Recovery | आमदार राहुल कुल कोरोनामुक्त, दौंडमध्ये जंगी स्वागत

BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.