इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्यामुळे आग पसरण्याची शक्यता

गोदामातील ठेवण्यात आलेले साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला आहे. ज्या गोदामाला आग लागली आहे, त्याच्या जवळ असणाऱ्या इमारतींना आग लागू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्यामुळे आग पसरण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:43 PM

भिवंडीः भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत (Dapoda Grampanchayat) हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन (Indian Corporation) या गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. ही आग पेपर साठविलेल्या गोदामात लागली असल्याने ती पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोदामातील साहित्यालाही काही अंशी आग लागली असल्याने आणि ती जर पसरत गेली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गोदामात असणाऱ्या प्लास्टीकच्या साहित्यामुळे आग पसरत असून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. या घटनेची माहिती अग्नि शमन दलाला दिली असून त्यांच्याकडून ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलात सायंकाळी भीषण आग लागली. प्लास्टीक आणि ज्वलनशील पदार्थामुळे आग गोदामामध्ये पसरत गेली.

कच्चा माल जळून खाक

त्यामुळे गोदामातील ठेवण्यात आलेले साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला आहे. ज्या गोदामाला आग लागली आहे, त्याच्या जवळ असणाऱ्या इमारतींना आग लागू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

प्लास्टीकमुळे आग पसरत गेली

ज्वलनशील पदार्थामुळे आणि प्लास्टीकमुळे आग पसरत गेली आहे. अग्निशमन दलाच्या साहित्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गोदामातील प्लास्टीक आणि इतर साहित्य ज्वलनशील असल्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोदामाला लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही, मात्र अग्नि शमन आणि खासगी टँकरच्या मदतीने ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.