मुंबई : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे (Bigg Boss 13 launch date). ‘बिग बॉस’चं 13 वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे दोन प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला, यामध्ये कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा शेफच्या रुपात दिसतो आहे. यावेळी तो ‘टेढा तडका’ लावण्याबाबत बोलतो आहे, म्हणजेच यंदाच्या पर्वात काहीतरी मजेशीर आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आता या कार्यक्रमाची तारीखही समोर आली आहे (Bigg Boss 13 premier).
#BiggBoss13 aa gaya hai parosne mad manoranjan!?
Dekhna na bhoole, #FirstDayFirstShow with @BeingSalmanKhan starting 29th September, 9 PM and Mon-Fri,10:30 PM. @Vivo_India #BB13 #SalmanKhan #BiggBossAnytime on @justvoot pic.twitter.com/Vl8rOj0chk
— COLORS (@ColorsTV) September 15, 2019
‘बिग बॉस-13’ च्या फॅन पेजवर या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आता कलर्सच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर अखेर या कार्यक्रमाच्या मुहुर्ताचा खुलासा करण्यात आला आहे. ‘बिग बॉस- 13’ येत्या 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 29 सप्टेंबरला रात्री 9 वाजता पहिला एपिसोड टेलिकास्ट होईल. यापूर्वी इन्स्टाग्रामच्या फॅन पेजवर याबाबतचा एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला होता.
यंदा ‘बिग बॉस’च्या पर्वात फक्त सेलिब्रिटी कंटेस्टंट सहभाग घेतील. गेल्या काही पर्वात सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती, मात्र यंदा फक्त सेलिब्रिटींमध्येच हा खेळ रंगणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंह, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अभिनेता राजपाल यादव, सीआयडी फेम अभिनेता दयानन्द शेट्टी, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, अभिनेत्री मेघना मलिक आणि अभिनेत्री आरती सिंह यांची नावं चर्चेत आहेत. ‘बिग बॉस-13’ च्या ग्रँड प्रीमिअर एपिसोडमध्ये अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या नवीन ‘छप्पन छुरी’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.
Honge saare systems crash, kyunki ab #BiggBoss13 par hoga sirf celebrities ka clash!
Starting 29 Sept, 9 PM aur Mon-Fri 10:30 PM@BeingSalmanKhan @Vivo_India #BiggBoss #BB13 #SalmanKhan pic.twitter.com/aSpa7pH2Iw— COLORS (@ColorsTV) September 16, 2019
संबंधित बातम्या :
Bigg Boss-13 : ‘बिग बॉस आदेश देत आहेत…’ बिग बॉसच्या घरात आता महिलेचा आवाज!
Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता
Bigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्विस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज