Bigg Boss 14 | कर्णधार अली गोनीवर मोठी जबाबदारी, नॉमिनेशन प्रक्रियेत ‘हे’ स्पर्धक अडकणार!
‘पब्लिक डिमांड’वर घरात आलेल्या कविता कौशिकने कर्णधार अली गोनीवर गटबाजी करत असल्याचा आरोप लावला.
मुंबई : दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात बरेच बॉम्ब फुटताना दिसले. सणाच्या निमित्ताने घरात बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. आनंदाने सुरू झालेला दिवस अखेर भांडणांनीच संपला. नाश्त्याच्या वेळी कविताच्या आरोपांमुळे घरात चांगलीच वादावादी पाहायला मिळाली. ‘पब्लिक डिमांड’वर घरात आलेल्या कविता कौशिकने कर्णधार अली गोनीवर (Aly Goni) गटबाजी करत असल्याचा आरोप लावला. त्यांनतर अली गोनी आणि कवितामध्ये जोरदार वाद रंगले (Bigg boss 14 latest Update Aly Goni Nominated 6 Contestant).
‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या (Diwali Celebration) मूडमध्ये दिसले. पारंपरिक भारतीय लूक तसेच डोक्यावर कव्वाली टोपी परिधान करुन स्पर्धकांनी सलमान खानचे स्वागत केले. तर, दिवाळी निमित्ताने घरात कव्वालीची मैफिल रंगली होती. राहुल वैद्य आणि जान कुमार सानू या दोघांनीही ‘कव्वाली’ सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, कव्वालीच्या या कार्यक्रमानंतर आता कविता कौशिक (Kavita Kaushik) आणि ‘कर्णधार’ अली गोनी (Aly Goni) यांच्या दरम्यान जोरदार भांडण झाले आहे.
Kab khatam hoga @KhanEijaz aur @Iamkavitak ka yeh ghamasaan yuddh?
Dekhiye aaj raat 10:30 baje. Catch it before TV on @VootSelect.@BeingSalmanKhan #BiggBoss #BiggBoss2020 #BiggBoss14 #BB14 @PlayMPL #DaburDantRakshak @TRESemmeIndia @LotusHerbals pic.twitter.com/h9Y0Fhi7cH
— COLORS (@ColorsTV) November 17, 2020
(Bigg boss 14 latest Update Aly Goni Nominated 6 Contestant)
‘कव्वाली’च्या निमित्त साधत घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर तूफान शेरेबाजी केली. ‘कव्वाली’च्या मूडमध्ये दोन्ही टीमच्या स्पर्धकांनी एकमेकांविरोधात बरीच टीका केली. यातूनच कविता आणि एजाज यांनी एकमेकांबद्दलचा राग देखील व्यक्त केला. या कव्वालीदरम्यान राहुल आणि जान यांच्यात कमालीची जुगलबंदी दिसली. होस्ट सलमान खाननेही या मजेदार कव्वालीचा आनंद लुटला (Bigg boss 14 latest Update Aly Goni Nominated 6 Contestant).
.@Iamkavitak ko lagta hai @AlyGoni bilkul saamajhdaar nahin hai. #BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan pic.twitter.com/MjwkhPyCfQ
— COLORS (@ColorsTV) November 16, 2020
(Bigg boss 14 latest Update Aly Goni Nominated 6 Contestant)
अली गोनी-कविता कौशिक यांच्या वादाचा धमाका
येत्या एपिसोडमध्ये सगळ्यांना कविता कौशिकचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने अलीला घरातील कोणत्याही 6 स्पर्धकांना निवडण्याचा अधिकार दिला. ‘बिग बॉस’च्या या आदेशानंतर अलीने रुबीना दिलैक, निक्की आणि कविता कौशिक यांची नावे नॉमिनेट केली. याच कारणावरून अली गोनी आणि कविता यांच्यात मोठी वादा-वादी रंगली. कविता कौशिकने अलीवर ‘ग्रुपमध्ये’ खेळत असल्याचा आरोप केला. तर, आपण हा खेळ वैयक्तिकरित्या खेळत असून, उत्तम पद्धतीने खेळत आहोत, असे कविता म्हणाली. तर, या वादादरम्यान अलीने कविताला ‘पागल औरत’ म्हटले. प्रत्युत्तर देताना कविताने त्याला ‘बदतमीज गुंडा’ म्हटले. यावरून आता दोघांमध्ये चांगलीच जुंपणार आहे.
Captain @AlyGoni ko mila vishesh adhikaar to choose kisse karna hai unhe iss hafte nominate. #BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan pic.twitter.com/kRHq9yuXsW
— COLORS (@ColorsTV) November 16, 2020
(Bigg boss 14 latest Update Aly Goni Nominated 6 Contestant)