Bigg Boss 14 | निशांत मलकानी या पर्वाचा पहिला कॅप्टन, ‘रेड झोन’मध्ये आणखी एका स्पर्धकाचा समावेश!

रुबिना, जान आणि निशांतच्या प्लॅननुसार रुबिना या खेळातून बाहेर जाते. आणि ठरल्याप्रमाणे ‘कॅप्टन’पदाची माळ निशांत मलकानीच्या गळ्यात पडते.

Bigg Boss 14 | निशांत मलकानी या पर्वाचा पहिला कॅप्टन, ‘रेड झोन’मध्ये आणखी एका स्पर्धकाचा समावेश!
निशांत मलकानी - बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता निशांत मलकानीने zee टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ ला बाय-बाय म्हटलं. या कार्यक्रमात तो मुख्य भूमिकेत होता.
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 9:48 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या घरातून तीनही तूफानी सिनिअर्सची ‘एक्झिट’ झाली आहे. आता संपूर्ण घराचा ताबा नव्या स्पर्धकांकडे आहे. खेळातून बाद झालेले एजाज आणि पवित्रा ‘रेड झोन’मध्ये अवतरले आहेत. यानंतरच्या पहिल्याच टास्कमध्ये (Captain task) त्या दोघांना संचालकाची भूमिका पार पडायची होती. या दरम्यान पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. तर, या सगळ्या वादांत स्पर्धक निशांत मलकानीने (Nishant Malkani) या पर्वाचा ‘पहिला कॅप्टन’ होण्याचा मान पटकावला आहे. (Bigg Boss 14 Latest update Nishant Malkani wins captain task)

संचालक असलेल्या पवित्रा आणि एजाजमध्ये स्पर्धकांमुळे वाद झाला आहे. एजाजच्या म्हणण्यानुसार रुबिना या टास्कमध्ये सगळ्यात शेवट बाहेर आली, तर पवित्राच्या म्हणण्यानुसार अभिनव सगळ्यात शेवट बाहेर आला आहे. भागाच्या सुरुवातीस हा टास्क सुरू करण्यात आला. मात्र, दोन्ही संचालकांच्या वादामुळे खेळ अडकून पडला होता.

शेवटी निर्णय ‘बिग बॉस’चा!

संचालक पवित्र पुनिया आणि एजाज खान यांच्यामध्ये वाद झाल्याने खेळ मधेच थांबवण्यात आला होता. यानंतर खुद्द अभिनव ने ‘आपणच सगळ्यात शेवटी बाहेर आलो’ ही बाब कबुल केली. तरीही एजाज स्वतःच्या मतावर अडून होता. या गोंधळामुळे शेवटी ‘बिग बॉस’ने त्यांना निर्णय घेण्याची ताकीद दिली. यानंतरही त्यांच्यात फरक न पडल्याने शेवटी बिग बॉसने या खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. या खेळातून जास्मीन भसीन आणि अभिनव शुक्लाला बाद करण्यात आले.( Bigg Boss 14 Latest update Nishant Malkani wins captain task)

निशांत बनला पहिला कॅप्टन

रुबिना, जान आणि निशांतच्या प्लॅननुसार रुबिना या खेळातून बाहेर जाते. आणि ठरल्याप्रमाणे ‘कॅप्टन’पदाची माळ निशांत मलकानीच्या गळ्यात पडते. यानंतर निशांतला घरातील अनेक सुविधा वापरण्याचा अधिकार मिळाला आहे. कॅप्टन बनल्यानंतर त्याने आपण इमानदारीने हा खेळ खेळू, असे वचन इतर स्पर्धकांना देतो. तर, दुसरीकडे जान कुमार सानू आईच्या आठवणीत भावूक झालेला दिसतो.

‘रेड झोन’मध्ये निक्कीचा प्रवेश!

या टास्क दरम्यान निक्की तंबोली आणि जान कुमार सानू यांच्या वाद झाले होते. दोघांमधले वाद मिटले असले तरी, निक्की याने खुश नाही. तो स्वतःहून घरातील ‘रेड झोन’मध्ये प्रवेश करते. यानंतर, पवित्रा तिला समजावण्याचा प्रयत्न करते. विना अनुमती या भागात प्रवेश करणे खेळाच्या नियमांच्या विरुद्ध असल्याने तिला शिक्षा होऊ शकते, असे पवित्रा तिला सांगते. मात्र, निक्की आपल्या निर्णयावर ठाम आहे. निक्कीच्या या कृतीमुळे आता कॅप्टन बनलेल्या निशांत मलकानीच्या अडचणींत वाढ झाली आहे.

(Bigg Boss 14 Latest update Nishant Malkani wins captain task)

संबंधित बातम्या : 

 ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?

‘पंजाबी जीजा’ सिद्धार्थनेच सारा गुरपालला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढले!

सिद्धार्थ शुक्लासह पवित्रा पुनिया, एजाज खान घराबाहेर?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.