Bigg Boss Marathi | अभिजीत केळकर ‘बिग बॉस’च्या घराबाहेर

बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन पाहायला मिळत आहे. अभिनेता अभिजीत केळकर यावेळी स्पर्धेतून बाद झाला आहे.

Bigg Boss Marathi | अभिजीत केळकर 'बिग बॉस'च्या घराबाहेर
Follow us
| Updated on: Aug 11, 2019 | 10:58 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) च्या दुसऱ्या पर्वातील धक्कादायक एलिमिनेशन्सचा सिलसिला सुरुच आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेला अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) बिग बॉसच्या घरातून बाद झाला आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या ‘विकेंडचा वार’चा मधील रविवारचा भाग सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) च्या उपस्थितीत पार पडला.

‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. या आठवड्यात अभिजीत केळकरसोबत शिव ठाकरे, किशोरी शहाणे-वीज आणि आरोह वेलणकर नॉमिनेट झाले होते. मात्र कमी मतं मिळाल्यामुळे अभिजीतला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला, अशी माहिती ‘TV9’ ला सूत्रांनी दिली आहे. हा भाग प्रेक्षकांना रविवारी रात्री पाहता येणार आहे.

सलमान खान रविवारच्या भागात सदस्यांच्या भेटीला आला आहे. सलमान ‘बिग बॉस’च्या हिंदी आवृत्तीचं सूत्रसंचालन करतो. पुढील महिन्यात या शोचं तेरावं पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सलमानने मराठी बिग बॉसच्या सेटवर हजेरी लावली.

महेश मांजरेकर यांनी शनिवारच्या भागात अभिजित केळकरची शाळा घेतली. या संपूर्ण आठवड्यात अभिजीत नियमांनुसार खेळला नसल्याचं मांजरेकरांनी सांगितलं. ‘चोरावर मोर’ या टास्कमध्ये अभिजीतने प्रतिस्पर्धी संघाला सहकार्य केलंच नाही. घरात फक्त तूच योग्य खेळतोस, असा तुझा समज आहे का? असं असेल तर तो समज खोटा आहे, असं म्हणत महेश मांजरेकरांनी अभिजीतची कानउघडणी केली.

Bigg Boss Marathi 2 | वीणाने पापण्यांवर कोरलं शिवचं नाव!

टास्कमध्ये हिरा कुठे लपवावा यासाठी आरोह वेलणकरने सुचवलेल्या जागांवरुन अभिजीतने त्याची खिल्ली उडवली होती. आरोहबद्दल अभिजीतने केलेल्या टिपण्णीवरुनही मांजरेकरांनी अभिजीतला सुनावलं. ‘आरोपी कोण?’ या टास्कमध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षक तरुणीनेही अभिजीतलाच आरोपी ठरवलं. त्याला सोफ्याभोवती बेडूक उड्या मारत माफी मागण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

अभिजीत केळकरविषयी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात होता. अभिजीत अनफेअर खेळत असल्याची तक्रार अनेक जण फेसबुक-ट्विटरवर करत होते. किशोरी शहाणे बाद होण्याची भीती अनेकांना सतावत होती. मात्र अखेर अभिजीतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बिचुकले-हीना यांनाही टपल्या

बिग बॉसच्या घरात सध्या बाथरुमच्या साफसफाईची ड्युटी नाकारणाऱ्या बिचुकलेंना पुन्हा महेश मांजरेकरांनी फैलावर घेतलं. तर कॅप्टन्सी टास्कमध्ये हीनाने दाखवलेल्या हलगर्जीबद्दल महेश मांजरेकरांनी तिला झापलं. बिचुकलेंची बाजू घेण्यावरुन किशोरी शहाणेही महेश मांजरेकरांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

Bigg Boss Marathi | रुपाली भोसले ‘बिग बॉस’च्या घरातून Eliminate

बिग बॉसच्या घरात आता वीणा जगताप, शिव ठाकरे, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले, हीना पांचाळ आणि आरोह वेलणकर हे आठ सदस्य आहेत. ग्रँड फिनालेमध्ये किती स्पर्धकांचा समावेश होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सहा स्पर्धकांचा समावेश महाअंतिम फेरीमध्ये होईल, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.