Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे काही फोटो
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (28 ऑक्टोबर) पार पडत आहे. (Bihar Assembly Election Voting)
-
-
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (28 ऑक्टोबर) पार पडत आहे. बिहारमधील 16 जिल्ह्यातील 71 जागांसाठी आज मतदान होत आहे. (Bihar Assembly Election Voting)
-
-
आज दुपारी 3 वाजेपर्यंत 46.29 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे
-
-
बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोना काळात होणारी पहिली निवडणूक आहे. त्यामुळे याकडे इतर राज्यांचेही लक्ष लागले आहे.
-
-
कोरोना काळातही बिहारमधील अनेक मतदार सकाळपासूनच मतदान करण्यासाठी घराबाहेर गर्दी करताना पाहायला मिळत आहे.
-
-
प्रत्येक मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. अनेक मतदान केंद्रावर पांढऱ्या रंगात गोलाकार वर्तुळही काढण्यात आली. त्या वर्तुळातच मतदानकर्त्यांनी उभे राहावे असे सांगण्यात आले आहे.
-
-
तसेच मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमानही तपासले जात आहे. त्याशिवाय प्रत्येकाला हातात घालण्यासाठी ग्लोव्हज दिले जात आहेत.