Bihar Election 2020 : ओपिनियन पोलमध्ये NDA ला बहुमत मिळण्याचा अंदाज, कुणाला किती जागा? 

बिहारच्या निवडणुकीवर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळताना दिसत आहे.

Bihar Election 2020 : ओपिनियन पोलमध्ये NDA ला बहुमत मिळण्याचा अंदाज, कुणाला किती जागा? 
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 11:13 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत 243 जागांसाठी जवळपास 7 कोटी मतदाते हजारो उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निर्णय घेणार आहेत. निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूक 3 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन टप्पे 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान पार पडणार आहेत. 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. याआधी बिहारच्या निवडणुकीवर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळताना दिसत आहे (Bihar Election 2020 Lokniti CSDS opinion poll).

लोकनीती-CSDC च्या या ओपिनियन पोलमध्ये NDA सत्तेत परत येत असल्याचं दिसतंय. हा सर्वे 10 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या काळात करण्यात आला. निवडणूकपूर्व पोलचा अंदाज हा असला तरी खरा निर्णय 10 नोव्हेंबरलाच कळणार आहे. निकालाच्या दिवशीच बिहारमध्ये NDA सत्तेत येणार की नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला ब्रेक मिळणार? हे स्पष्ट होणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत राजदची महाआघाडी जिंकणार की हरणार याचाही निर्णय 10 नोव्हेंबरला होणार आहे.

लोकनीती-CSDS चा सर्वे काय सांगतोय?

243 सदस्यीय बिहार विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची गरज आहे. ओपिनियन पोलनुसार NDA ला 133-143 जागा मिळताना दिसत आहेत, तर महाआघाडीला 88-98 जागा मिळताना दिसत आहेत. NDA तून बाहेर असलेल्या लोकजनता पक्षाला (LJP) 2 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष 6-10 जागांवर मर्यादित राहिल असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.

हेही वाचा :

Bihar Election 2020: भर सभेत राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर ‘चप्पल फेक’

बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट

Kapildev Kamat | नितीश कुमारांच्या निकटवर्तीय मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

Bihar Election 2020 NDA may get Majority according to Lokniti CSDS opinion poll

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.