बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान

आता बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. | Bihar Election 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:01 PM

पाटणा: गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020 ) टप्प्यात जवळपास 53.51 टक्के इतके मतदान झाले. 94 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानप्रक्रियेत मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, तेजस्वी यादव, लोजप प्रमुख चिराग पासवान या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. तर तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह 1450 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आता बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) यांच्यात लढत होत आहे. (Bihar Election second phase voting completed)

तर दुसरीकडे बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळीही पाहायला मिळाली. यावेळी हरलाखी येथील प्रचारसभेत नितीश कुमार यांना कांदे फेकून मारण्यात आल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच नितीश कुमार यांच्या अंगरक्षकांनी तात्काळ त्यांच्याभोवती सुरक्षाकडे तयार केले. यानंतरही नितीश कुमार तावातावाने भाषण देत राहिले. अजून कांदे फेका, फेकत राहा, याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले. या घटनेची आज दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत महाआघाडीवर जोरदार टीका केली. बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’चा अडचण वाटते. बिहारच्या जनतेने या लोकांपासून सतर्क राहत त्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान झाले होते. 243 जागांपैकी 71 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 54.94 टक्के मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच कोरोना रुग्ण आणि दिव्यांगांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

तेजस्वी यादवांचे टीकाकार 10 तारखेला ‘खामोश’ होणार, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

(Bihar Election second phase voting completed)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.