Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result 2020 : निकालांमध्ये तेजस्वी यादव पुढे, गुगल ट्रेण्ड्मध्ये मात्र नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये राजदचे (RJD) तेजस्वी यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढे आहेत, गुगल ट्रेण्ड्मध्ये मात्र नितीश कुमार यांचाच बोलबाला पाहायला मिळतोय.

Bihar Election Result 2020 : निकालांमध्ये तेजस्वी यादव पुढे, गुगल ट्रेण्ड्मध्ये मात्र नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:07 PM

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने सध्या 77 जागांवर आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रीय जनता दल (राजद) 65 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जदयू पक्ष तिसऱ्या क्रमांकार आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एकट्याने भाजप आणि जदयूचा जोरदार सामना करत 65 जागांवर आघाडी घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आघाडीवर असलेल्या जागांच्या बाबतीत तेजस्वी यादव पुढे असले तरी गुगल ट्रेण्ड्मध्ये मात्र नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांच्या पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Bihar Election Result 2020 LIVE Updates)

सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या जीवनावर त्याचे परिणाम आपण नेहमीच पाहात असोत. निवडणुकीतदेखील सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका निभावतो. राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, निवडणुकीचा जाहीरनामा प्रसारित करण्यासाठी, विरोधी पक्षावर टीका करण्यासाठी, आपला अजेंडा राबवण्यासाठी, आपल्या इच्छेनुसार मतदानावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. सध्या सुरु असलेल्या बिहार निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला पाहायला मिळतोय.

काय म्हणतायत गुगल ट्रेण्ड्स

गुगल ट्रेण्ड्सनुसार बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत, तर नितीश कुमार हळूहळू पुढे सरकतायत, मात्र दोघांमध्ये फारसा फरक नाही. पक्षांचा विचार केला तर NDA (BJP + JDU) आणि MGB (RJD + INC) मध्ये कांटे की टक्कर आहे. परंतु गुगल ट्रेण्ड्सचा विचार केला तर एनडीएला बहुमत मिळू शकतं. तसेच या निवडणुकीत राजद हा पक्ष दुसऱ्या स्थानी राहील.

सोशल मीडियावर नितीश VS तेजस्वी

1. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत बिहारचे मुख्मंत्री नितीश कुमार तिसऱ्या स्थानावर आहेत 2. ऑक्टोबर महिन्यात नितीश कुमार यांच्या तुलनेत तेजस्वी यादव यांच्या फॉलोईंमध्ये वृद्धी दिसली. 3. नितीश कुमार यांच्या तुलनेत तेजस्वी यादव यांच्या ट्विट्सवर पाचपट अधिक ट्राफिक पाहायला मिळालं. 4. फॉलोवर्सशी संवाद करण्याच्या बाबतीत तेजस्वी नितीश कुमार यांच्या पुढे आहेत. 5. फेसबुकवरील फॉलोवर्सच्या बाबतीतही तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्या पुढे आहेत.

सोशल मीडियावर BJP vs RJD vs JDU

भाजप, राजद आणि जदयू या तिन्ही पक्षांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील अॅक्टिव्हिटी पाहिल्या तर लक्षात येईल की, भाजपचा आयटी सेल अधिक अॅक्टिव्ह आहे. निवडणूक काळात RJD ने फेसबुकवर केवळ 301 पोस्ट शेअर केल्या, तर JDU ने 441 पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोन्ही पक्षांपेक्षा अधिक अॅक्टिव्हिटी भाजपच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर तब्बल 620 पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि लाईव्हचा समावेश आहे. ट्विटरवर मात्र राजदचे भाजपपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. मात्र रिट्विट्सच्या बाबती भाजप पुढे आहे.

संबंधित बातम्या

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

Bihar Election Result ! मतमोजणी धीम्यागतीने नाही, पण…; निकालाला उशीर का लागतोय? निवडणूक आयोगाने दिलं ‘हे’ कारण

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.