नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा खडबडून जागे झाले आहेत. या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे धाव घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Tension built between congress party leaders may put new proposal in front of Sonia Gandhi)
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता. काँग्रेसने आणखी दहा जागांवर विजय मिळवला असता तर कदाचित या निवडणुकीचे चित्र पालटले असते.
या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष देण्याची मागणी उचलून धरली आहे. संघटनात्मक स्तरावर काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. त्यामुळे आता पक्षाला पूर्णकाळ काँग्रेसच्या बांधणीकडे लक्ष देईल अशा अध्यक्षाची गरज असल्याची बाब पक्षातील बडे नेते बोलून दाखवत आहेत. त्यासाठी हे नेते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे विनंती करणार असल्याचेही समजते.
काँग्रेसला पूर्णकाळ अध्यक्ष नसल्याने केंद्र आणि राज्य स्तरावर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण पक्षात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे आतातरी सोनिया गांधी यांनी पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हट्टाने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये प्रचारासाठी अवघ्या आठ सभा घेतल्या होत्या. राहुल गांधी वगळता राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बिहारच्या प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता.
काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल
अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतत कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संबंधित बातम्या:
बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?
नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा
(Tension built between congress party leaders may put new proposal in front of Sonia Gandhi)