बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता

बिहार पोलिसांनी सुशांत सिंहच्या मॅनेजर आत्महत्येप्रकरणाचाही तपास सुरु केला आहे (Bihar Police on Suicide of Sushant Manager Disha Saliyan).

बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता
Follow us
| Updated on: Aug 02, 2020 | 1:04 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने तपास एका नव्या मुद्द्यावर सुरु केला आहे (Bihar Police on Suicide of Sushant Manager Disha Saliyan). बिहार पोलिसांनी सुशांतची मॅनेजर दिशा सालीयनच्या आत्महत्येचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दिशा सालीयन ही सुशांतच्या कंटेंट मॅनेजमेंट टीममध्ये होती. तिने 8 जून रोजी आत्महत्या केली. म्हणजेच सुशांतच्या आत्महत्येच्या (14 जून) 5 दिवस आधी आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचा संबंध 5 दिवसांपूर्वीच झालेल्या त्याच्या मॅनेजरच्या आत्महत्येशीही जोडला गेला. मात्र, आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या तपासात तो मुद्दा तितका प्रकर्षाने पुढे येताना दिसला नाही. मात्र, बिहार पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रं हलवत सुशांतच्या आत्महत्येच्या संबंधात या सर्वच दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली. दिशा सालीयन सुशांतची कंटेंट मॅनेजर होती. मात्र, दिशा एकदाच सुशांतला भेटल्याचंही सांगितलं जातं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बिहार पोलीस आता दिशाच्या आत्महत्येची कागदपत्रे देखील पाहणार आहे. तसेच दिशा सालीयन हिने आत्महत्या केली त्या ठिकाणालाही हे पथक भेट देणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी सुशांतची मॅनेजर दिशा सालियानवर तपास केंद्रित केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बिहार पोलिसांचं पथक मालाड पोलीस ठाण्यात पंचनामा कॉपी, कॉल डिटेल्स आणि कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 48 तासात बिहार पोलीस मोठी कारवाई करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुशांतची मॅनेजर दिशा सालियान हिचे पिता दादर नायगाव येथे राहतात. त्यामुळे बिहार पोलीस येथेही पोहचू शकतात. सध्या सालियान यांच्या घराचा दरवाजा कुणीही उघडत नाही. ते घरी नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे बिहार पोलीस दिशा सालीयान आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध शोधण्यात यशस्वी ठरतात की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून मोठ्या रकमांचे व्यवहार

  • 14 जुलै 2019 – 45,000 रुपये
  • 22 जुलै 2019 – 55,000 रुपये, 36,000 रुपये
  • 2 ऑगस्ट 2019 – 86,000 रुपये
  • 8 ऑगस्ट 2019- 11,000 रुपये
  • 15 ऑगस्ट 2019- 60,000 रुपये

या रकमा घरातील पुजेसाठी काढण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र, या रकमा काढल्यानंतर अशी कोणतीही पूजा झाली नाही.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार

Sushant Singh Rajput Suicide Investigation | सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा, आतापर्यंत 16 जणांचे जबाब

Bihar Police on Suicide of Sushant Manager Disha Saliyan

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.