GOOD NEWS : आता मेट्रोमध्येही प्री-वेडिंग फोटोशूट आणि वाढदिवस साजरा करता येणार
वाढदिवस, प्री-वेडिंग शूट किंवा इतर काही खास दिवस तुम्ही मेट्रो कोचमध्ये साजरे करु (Birthday and pre-wedding shoot in metro train) शकता.
लखनऊ : तुमचा वाढदिवस किंवा इतर कोणताही दिवस खास बनवण्यासाठी नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC-Noida Metro Rail Corporation) एका खास स्कीम सुरु केली आहे. वाढदिवस, प्री-वेडिंग शूट किंवा इतर काही खास दिवस तुम्ही मेट्रो कोचमध्ये साजरे करु (Birthday and pre-wedding shoot in metro train) शकता. यासाठी तुम्हाला तासानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
मेट्रो कोचमध्ये वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम साजरे करण्यासाठी तुम्हाला बुकिंग करावी (Birthday and pre-wedding shoot in metro train) लागेल. बुकिंग झाल्यानंतर प्रत्येक तासाला कमीत कमी पाच ते 10 हजार रुपये तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. याशिवाय बुकिंग करताना सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून तुमच्याकडून 20 हजार रुपये घेतले जातील. ते परत तुम्हाला दिले जाणार.
मेट्रोमध्ये वाढदिवस आणि प्री-वेडिंग शूट करण्याची संधी नोएडाच्या मेट्रो कोचमध्ये मिळणार आहे. चालत्या किंवा उभ्या असलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये तुम्हाला याची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला जवळपास दहा हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने याची अधिकृत घोषणा केली आहे. मेट्रोच्या कोचमध्ये बर्थडे, प्री-वेडिंग किंवा इतर कोणताही प्रोग्राम करु शकता. पण यासाठी NMRC च्या काही अटी आहेत. या अटींचे पालन तुम्हाला करावे लागेल. विशेष म्हणजे मेट्रोमध्ये प्रोग्राम करण्यासाठी वेळ निवडण्याची सुविधाही देण्यात आली आहे. दररोजच्या वेळेत किंवा रात्री 11 ते मध्य रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही वेळ निवडू शकता. एका कोचमध्ये 50 पेक्षा अधिक लोक बसू शकतात.
नियम आणि अटी
नोएडाच्या सेक्टर 51 मेट्रो स्टेशन ते डेपो स्टेशनपर्यंत रेगुलर रनिंग मेट्रो कोचमध्ये सजावट न करता राऊंड ट्रिप प्रति तास आठ रुपये फी द्यावी लागणार. तर नोएडा सेक्टर 51 आणि डेपो मेट्रो स्टेशनवर उभ्या असलेल्या मेट्रोमध्ये सजावट न करता प्रति तास पाच हजार फी भरावी लागेल.
नोएडा सेक्टर 51 मेट्रो स्टेशन ते डेपो स्टेशनपर्यंत रेगुलर रनिंग मेट्रो कोचमध्ये सजावटीसह राऊंड ट्रिप प्रति तास दहा हजार रुपये. तर नोएडा सेक्टर 51 आणि डेपो मेट्रो स्टेशनवर उभ्या असेलली, तसेच सजावट केलेल्या मेट्रो कोचची फी सात हजार रुपये प्रति तास असेल.