पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी राष्ट्रपती शासन लागू करा, भाजपची मागणी

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी राष्ट्रपती शासन लागू करा, भाजपची मागणी
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:07 PM

कोलकाता : पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 आणि 6 नोव्हेंबरला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे सरचिटणीस आणि बंगालचे केंद्रीय प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत माहिती दिली.कोरोनामुक्त झाल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिला पश्चिम बंगाल दौरा असणार आहे (BJP demands imposition of president rule in bengal before elections).

कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासनाशिवाय निष्पक्ष निवडणुका शक्य नाही, असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी गुरुवारी (29 ऑक्टोबर) नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर विजयवर्गीय यांचं हे विधान आलं आहे.

विजयवर्गीय म्हणाले, “मला व्यक्तिगतपणे वाटतं की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाल्याशिवाय निष्पक्षपणे विधानसभा निवडणूक होऊ शकत नाही. कारण या ठिकाणी आधी नोकरशाहीचं राजकीयकरण झालं आहे. ही स्थिती इथपर्यंत ठिक होती, पण आता या नोकरशाहीचं गुन्हेगारीकरण देखील झालं आहे.”

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमताने सरकार स्थापन होणार, भाजपचा दावा

विजयवर्गीय म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये निष्पक्षपणे निवडणूक झाल्यास येथे भाजपचंच सरकार येईल. पश्चिम बंगालची जनता ममता बॅनर्जी यांच्या भ्रष्ट सरकारला कंटाळली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका मुलाखतीत पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था योग्य नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि आम्ही लोकनियुक्त सरकारविषयी संवैधानिक मार्गानेच निर्णय घेऊ.”

“आम्हाला वाटतं योग्यवेळीची वाट पाहिली पाहिजे. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपला अहवाल दिला आहे. राज्यपालांनी याआधी बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.”

हेही वाचा :

‘कोरोना झाल्यास ममता बॅनर्जींना मिठी मारेन’, इशारा देणारा भाजप नेता कोरोना पॉझिटिव्ह

सोनियांसमोर ममता म्हणाल्या, उद्धवजी अच्छी फाईट कर रहे हो, उद्धव म्हणाले, लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूँ

ममतादीदी, ‘कोरोना एक्स्प्रेस’ तुमचा ‘एक्झिट रुट’ ठरेल, अमित शाह यांचा घणाघात

BJP demands imposition of president rule in bengal before elections Amit Shah will visit in November

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.