ईव्हीएमवरून ठाकरे-फडणवीस यांच्यात जुंपली; फडणवीस म्हणाले, ओपन चॅलेंज दिलंय…

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही. पण नजनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समाचार घेतला.

ईव्हीएमवरून ठाकरे-फडणवीस यांच्यात जुंपली; फडणवीस म्हणाले, ओपन चॅलेंज दिलंय...
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 3:11 PM

नागपूर| 3 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही. पण नजनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समाचार घेतला आहे. हे ( विरोधक) जिंकले तर ईव्हीएम चांगली असते, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असं धोरण आहे यांचं. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केलं आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीसांचा एकच सवाल

माझा, या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा ? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं काही करू शकलेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी केली होती टीका

माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात टीका केली. आज शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारववर कडाडून हल्ला चढवला. EVM च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेचा या सरकारला कौल नाही. जनता या सरकारच्या पाठिशी नाहीये, त्यामुळे हे सरकार ही निवडणूक काही जिंकणार नाही, असं ते म्हणाले. पण तरीही जनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. याच मुद्यावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.