जळगाव : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे आज (16 जून) निधन झालं. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “हरिभाऊ जावळेंना कोरोना झाला होता. त्यांना इंजेक्शन वेळेवर मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता,” असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले. तसेच हरिभाऊंविषयी बोलताना खडसेंना अश्रू अनावर झाले. (BJP Jalgaon president Haribhau Jawale death Eknath Khadse Cried)
एकनाथ खडसे काय म्हणाले?
“हरिभाऊ जावळेंचं भाजप विस्तारात फार मोठं योगदान राहिलं आहे. आमदार, खासदार म्हणून पूर्ण महाराष्ट्राभर तसेच जळगावात एक आगळावेगळा ठसा उमटवला होता. हसरं व्यक्तिमत्त्व, मनाने निर्मळ असे ते नेते होते. ते सर्वांना सोबत घेऊन सहकार्याच्या भावनेने काम करत होते,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
“हरिभाऊंना कोरोनाचा आजार झाला. या आजारात त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर दहा-बारा दिवस ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती, ते उपलब्ध होऊ शकलं नाही. परवा दिवशी दोन, आज तीन, आज दोन, असे सात इंजेक्शन आज उपलब्ध झाले. आज त्यांचा कोर्स सुरु होणार होता. कदाचित तो कोर्स सुरु झाला असता, तर त्यांचा जीव वाचला असता. पण खूप प्रयत्नानंतरही ते उपलब्ध होऊ शकत नाही. मी स्वत: मुंबईतील रुग्णालयात होतो. त्यांच्या मुलाने आणि मी ते इंजेक्शन मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते मिळाले नाही,” असेही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितले.
त्यांच्या निधनामुळे भाजपची आणि समाजाची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ती भरुन निघणं फार कठीण आहे. त्यांची आठवण आम्हाला कायमस्वरुपी राहील. एक हसरं व्यक्तिमत्व, मनाने निर्मळ असा हा नेता सर्वांना सोबत घेऊन काम करणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.
कोण होते हरिभाऊ जावळे?
(BJP Jalgaon president Haribhau Jawale death Eknath Khadse Cried)
संबंधित बातम्या :
भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन