भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’, मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही लागण

माजी खासदार आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. (BJP Leader Jyotiraditya Scindia corona test positive)

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना 'कोरोना', मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही लागण
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. ज्योतिरादित्य यांच्या मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर राजधानी दिल्लीतील साकेत मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. (BJP Leader Jyotiraditya Scindia corona test positive)

शिंदे मायलेकाला ‘कोरोना’ची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग कुठून झाला असावा, यासाठी डॉक्टर काँटॅक्‍ट ट्रेसिंग करत आहेत.

हेही वाचा : मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय

भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे थेट भोपाळहून दिल्लीला आले होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते दिल्लीतच आहेत. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये गेलेले नाहीत. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी समर्थक त्यांची प्रतीक्षा करत होते.

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?

कोणे एके काळी काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे जेमतेम तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात असत. राजघराण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य संवाद, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. (BJP Leader Jyotiraditya Scindia corona test positive)

ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडेसात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.

गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून 2002 साली पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. आतापर्यंत ते सलग 4 वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांच्या आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री, तर यशोधरा राजे यांनी मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे.

केजरीवाल यांचीही कोविड चाचणी

दरम्यान, देशात ‘कोरोना’चा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ताप आणि घसा खवखवत असल्यामुळे कोविड चाचणी घेतली जाणार आहे. संध्याकाळी त्यांची टेस्ट घेण्यात येणार आहे.

(BJP Leader Jyotiraditya Scindia corona test positive)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.