धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, अन्यथा लोक रस्त्यावर फिरु देणार नाहीत : राम शिंदे
राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी कमकुवत ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. (Ram Shinde Comment on Maratha And Dhangar Community Reservation)

अहमदनगर : “मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. अन्यथा रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत,” असा इशारा माजी मंत्री आणि भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सरकारला दिला आहे. अहमदनगरमधील कर्जत येथील एका कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. (Ram Shinde Comment on Maratha And Dhangar Community Reservation)
“माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस पावले उचलली आहेत. तसेच राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदा आणला. तो कायदा हायकोर्टामध्ये टिकला. मात्र राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले. मात्र त्याठिकाणी राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी अपयशी आणि कमकुवत ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.”
“तसेच जे पाहिजे ते वकील दिले नाही. त्यामुळे मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला आहे. त्यावेळी जे सत्तेत होते, ते आता सरकारमध्ये आहे. मग त्यांनी हा प्रश्न का चिघळवला,” असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
“त्याचबरोबर धनगर समाज्याच्या आरक्षणाचा प्रश्न देखील गंभीर स्वरूप धारण केलं आहे. लोकांनी मोठं-मोठी आंदोलन केली. धनगर आरक्षणाचा प्रश्न मराठा आंदोलनामध्येच सुटला पाहिजे. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
“तसेच विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत असताना एक भूमिका मांडायची. सर्वच प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे अन्यथा आम्ही स्वतः बसू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.(Ram Shinde Comment on Maratha And Dhangar Community Reservation)
शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीसhttps://t.co/DInmPSCdZr #AgricultureBills #AgricultureBill #Devendrafadnavis @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2020
संबंधित बातम्या :
शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक