आम्ही आणलेली शेतकरी विधेयकं काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यातही, भाजप नेते सुधीर दिवेंचा दावा
कॉंग्रेस विधेयकाला विरोध करुन राजकारण करीत असल्याची टीका भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे यांनी केली आहे (BJP leader Sudhir Dive on Agri bill).
वर्धा : काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात वचन दिलेली होती तिच शेतकरी विधेयकं आम्ही आणली आहेत. पण कॉंग्रेस विधेयकाला विरोध करुन राजकारण करीत असल्याची टीका भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे यांनी केली आहे (BJP leader Sudhir Dive on Agri bill). त्यामुळे भाजपने अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्याचं मान्य करत आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
भाजपकडून एक देश, एक बाजार अशी घोषणा देत शेतकरी विधेयकांचा प्रचार केला जात आहे. मात्र, विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांकडून या विधेयकांवर सडकून टीका होत आहे. असं असलं तरी भाजपकडून पत्रकार परिषदा घेत शेतकऱ्यांना ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वर्ध्यातही आज भाजपने शेतकरी विधेयकाबाबत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी विरोधकांकडून या विधेयकाला सुरु असलेला विरोध हा राजकीय आहे. सोबतच हे दोन्ही विधेयक शेतकरी केंद्रित आहेत, असा दावा भाजपने केला आहे.
सुधीर दिवे म्हणाले, “या विधेयकादरम्यान शेतकऱ्यांशी केलेला करार कोणी मोडला तर यात अडीच पट दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर शेतकरी आपला माल कुठेही कोणत्याही कंपनीला, उद्योजकाला किंवा इंडस्ट्रीला शेतकरी ठरवेल त्या दराने देऊ शकतो. यात शेतकऱ्याचे हित साध्य होणार आहे. जे या विधेयकाला विरोध करत आहेत ते बाजार समितीमधील व्यापारी आणि दलाल आहेत. त्यांचा एकाधिकार संपणार आहे म्हणून हा विरोध सुरु आहे.”
संबंधित बातम्या :
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस
कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी
शरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार
BJP leader Sudhir Dive on Agri bill and Congress menifesto Vardha