नवी दिल्लीः बहुजन समाज पक्षाचे (BSP) एकेकाळची मोठे नेते ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) यांनी गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. त्यानंतर 2017 मध्ये पाठक यांनी लखनऊच्या मध्यविभागातून भाजपच्या (BJP) तिकिटावर विजयी झाले होते. योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील उपमुख्यमंत्री व भाजपचा ब्राह्मण चेहरा असलेल्या दिनेश शर्मा यांची नव्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र केशव प्रसाद मौर्य यांची खुर्ची कायम ठेवण्यात आली आहे.
योगी सरकार 2.0 मंत्रिमंडळात दिनेश शर्मा यांच्या जागी ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यामुळे या निवडीनंतर दिनेश शर्मा यांच्याऐवजी ब्रजेश पाठक यांना इतकं का महत्त्व देण्यात आले आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेश सरकार में उपमुख्यमंत्री बनाये जाने पर शीर्ष नेतृत्व का हार्दिक आभार एवं धन्यवाद व्यक्त करता हूँ। @rashtrapatibhvn@PMOIndia@Narendramodi@AmitShah@rajnathsingh@jpnadda@myogiadityanath@BJPIndia@BJPUP pic.twitter.com/v42bH3hMDi
— Brajesh Pathak (@brajeshpathakup) March 25, 2022
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये,15 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेवर आले तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा मुकुट योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यावर चढविण्यात आला होता. पण सत्तेचा समतोल राखण्यासाठी आणि जातीय समीकरणातील तोल सांभाळण्यासाठी भाजपकडून लखनऊचा महापौर व ब्राह्मण चेहराही कायम ठेवण्यात आला, त्यावेळी ओबीसी समाजातील डॉ. दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.
उत्तर प्रदेश सरकार के शपथ ग्रहण समारोह में देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, महामहिम राज्यपाल मा० आनंदीबेन पटेल जी एवं यशस्वी केंद्रीय मंत्रीगणों, केंद्रीय शीर्ष व प्रदेश नेतृत्व की गरिमामयी उपस्थिति में उत्तर प्रदेश सरकार के उपमुख्यमंत्री पद की शपथ ग्रहण करते हुए pic.twitter.com/nkMKJ5TOWm
— Brajesh Pathak (@brajeshpathakup) March 25, 2022
उत्तर प्रदेशच्या विधानसभेची 2017 ची निवडणुकीपूर्वी बसपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले ब्रजेश पाठक लखनऊच्या मध्य मतदारसंघातून आमदार झाले होते. यानंतर योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन विधिमंडळ, न्याय आणि ग्रामीण अभियांत्रिकी सेवा ही खाती देण्यात आली. आता उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता आल्याने ब्रजेश पाठक यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळेच योगी मंत्रिमंडळ 2.0 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते योगी सरकारच्या पहिल्या टप्प्यात विरोधकांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा ब्राह्मणविरोधी अशी तयार केली होती. या काळात दिनेश शर्मा उपमुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाकडून वेगळे काही केले नाही.
भाजपमधील एका दिग्गज नेत्यांने ब्रजेश पाठक यांच्यामध्ये ब्राह्मण नेत्याची प्रतिमा निर्माण केली, आणि त्यानंतरच योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्रजेश पाठक यांनी सुरुवातीपासूनच स्वतःला ब्राह्मण नेता म्हणूनच आपली प्रतिमा तयार करण्यात ते व्यस्त होते. ब्रजेश पाठक म्हणजे काँग्रेसपासून ते बसपर्यंत आणि बसपापासून ते भाजपर्यंत ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे.
योगी सरकार जेव्हा 2017 मध्ये स्थापन झाले तेव्हा रायबरेलीमधील उंचाहार विधानसभा मतदारसंघातील आपटा गावात पाच ब्राह्मणांना जाळून मारण्यात आले होते. त्यानंतर ब्रजेश पाठक यांनी हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला. त्यांनी ज्या प्रकारे हा मुद्दा लावून धरला त्याप्रकारे दिनेश शर्मा हे सक्रीय दिसले नाहीत. मात्र त्यानंतर या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली.
त्याचवेळी बिक्रू घोटाळ्यातील आरोपी माफिया विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सर्व विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ब्राह्मणविरोधी असल्याची टीका त्यांच्यावर केली. त्यावेळी ब्रजेश पाठक योगी आदित्यनाथ यांच्या मागे ठामपणे उभा राहिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी योगी सरकारच्या बचावासाठी ब्राह्मणांमध्ये एकी करण्याचा प्रयत्न केला.
लखीमपूरमध्ये टिकुनियाच्या गदारोळात 8 लोकांचा मृत्यू झाल्याने भाजप बॅकफूटवर गेले. कारण या प्रकरणाच्या मध्यस्थानी देशाचे गृह राज्यमंत्री अजय टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा होते. यामध्ये चार शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला होता. त्याकाळात भाजपचे कार्यकर्ते ब्राह्मण होते, मात्र पक्षातील कोणताही कार्यकर्ता बोलायला तयार नव्हता.
या वेळीही मग ब्रजेश पाठक यांनी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधी प्रसंगी स्वतः उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते आणि त्यावेळी त्यांना सांगितले होते की, तुमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्याकाळात ब्रजेश पाठक यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मात्र भाजपमधील अनेक नेत्यांची रांग त्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लागली होती.
आपणसा कळविण्यास दु:ख होते की, देशाची शान असलेल्या शिलाबद्दल बंगालमधून दु:खद वृत्त
Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण शिवाजी पार्कवरचं, देवेंद्र फडणीसांचा खोचक टीका
Pravin Darekar यांना धक्का, मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला