धनगर आरक्षणासाठी पडळकर आक्रमक, सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेगळं आंदोलन सुरु झालं आहे. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation)
मुंबई : महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाचे राजकारण्यांनी आतापर्यंत फक्त राजकीय शोषण, रक्तशोषण केले. पण आरक्षणासाठी धनगर समाज आता शोषण करणाऱ्या सरकारलाच रक्तादानच्या हजारो बाटल्या देणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेगळं आंदोलन सुरु झालं आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation)
धनगर समाजाने आरक्षणासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली आहे. प्रत्येक पक्षाने आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या समाजाला वापरले. त्यांचे राजकीय शोषण केले. अनेक ठिकाणी मेंढपाळावर हल्ले झाले. त्यांच्या रक्त शोषण केले.
संविधानाने जे दिलं आहे ते फक्त द्या, एवढीच मागणी धनगर समाज करतो आहे. पण सत्ताधारी लोक लक्ष देत नाहीत. यासाठीच 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात रक्तदानाची चळवळ सुरू झाली आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रक्तदान केलेल्या 10 हजार बाटल्या राज्य सरकारकडे देणार आहेत. हे रक्त राज्यातील गरजूंना उपयोगी तर पडेलच, पण या माध्यमातून सरकारने आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे हा आग्रह असणार आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation)
संबंधित बातम्या :