अमरावतीचे भाजप आमदार प्रवीण पोटे यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, ‘अमरावती बंद’चे केले होते आवाहन

अमरातीतील शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून अनेक भाजप नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. आज भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

अमरावतीचे भाजप आमदार प्रवीण पोटे यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 'अमरावती बंद'चे केले होते आवाहन
अमरावतीत भाजप आमदार प्रवीण पोटे यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 2:43 PM

अमरावतीः शहरातील हिंसाचार आणि तोडफोड (Amravati Riots) प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून भाजप कार्यकर्ते व नेत्यांची धरपकड सुरु आहे. याच मालिकेला आज आणखी वेगळे वळण मिळाले. अमरावतीतील माजी राज्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण पोटे (Pravin Pote) यांनी अमरावती सिटी पोलीसांसमोर (Amravati Police) स्वतःहून अटक करुन घेतली. प्रवीण पोटे यांनीच 13 नोव्हेंबर रोजी ‘अमरावती बंद’ चे आवाहन केले होते. पोटे यांच्यासोबत आज इतर दहा भाजप कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली.

पोलिसांसमोर भाजप आम दारांचं आत्मसमर्पण

अमरावतीत उसळलेल्या हिंसाचारात भाजप नेत्यांचा हात आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनीही मागील तीन दिवसात अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली. भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक केली होती. अमरावतीची शांतता भंग करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला होता. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही अमरावतीत न येण्याची विनंती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

संचारबंदीचा पाचवा दिवस

दरम्यान, अमरावतीतील संचार बंदीचा आज पाचवा दिवस आहे. शहराती इंटरनेट सेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम बँकांवरही झाला आहे. शहरातील 100 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प  पडले आहेत. भाजी बाजारही गेल्या चार दिवसांपासून बंद असल्यामुळे भाज्यांच्या किंमतीत तिपटीने वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांना या संचारबंदीचा चांगलाच फटका बसत आहे. संचारबंदीतून चार तासांची सूट देण्यात आली असली तरीही इंटरनेट बंद असल्याने बँकेत ऑनलाइन व्यवहार बंद पडलेले आहेत.

इतर बातम्या-

पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा थयथयाट, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच उगारली चप्पल, पुण्यातला प्रताप!

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.