Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमध्ये पांडुरंगाची महापूजा करणं अंगलट, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये पांडुरंगाची महापूजा करणं अंगलट, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये पांडुरंगाची महापूजा करणं अंगलट, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 4:12 PM

पंढरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात (BJP MLA Sujit singh thakur) आला आहे. तसेच राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून संचारबंदी लागू आहे. या दरम्यान वर्षातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या चैत्री यात्रेच्या दिवशी सुध्दा पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद होते. मंदिर बंद असूनही उस्मानाबादचे भाजप आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी 4 एप्रिल रोजी पहाटे विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात प्रवेश करुन पूजा करत कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (BJP MLA Sujit singh thakur) झाला आहे.

सुजित सिंह ठाकूर यांनी 4 एप्रिल रोजी पहाटे 3.30 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्निक पूजा अर्चा करत कायद्याचे उल्लंघन केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे आणि अन्य पदाधिकऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी करुन पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन दरम्यान सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आली आहेत. तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्याचे आवाहन सरकारने केले होते. याच दरम्यान पंढरीची चैत्री वारी वारकऱ्याविना साजरी झाली. तसेच मंदिरातील शासकीय महापूजा भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते झाली. त्यामुळे पंढरीत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपूर मंदिराच्या बाहेरुनच नामदेव पायरी आणि विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले होते. मंत्री असूनही स्वत: आव्हाड हे विठ्ठल दर्शनाला गेले नाहीत. पण सदस्य आमदारांनी महापूजा करुन बातमीद्वारे प्रसारण करणे हे कृत्य अशोभनीय आणि बेकायदेशीर असल्याचे मत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदिप मांडवे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या जवळ पोहोचला आहे. तर देशात कोरोनाबाधितांच्या आकडा 4 हजारांवर पोहोचला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.