साध्वी प्रज्ञा आता ‘शूद्रांवर’ घसरल्या, नव्या वादाला तोंड फुटलं

प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. | Pragya Singh Thakur

साध्वी प्रज्ञा आता 'शूद्रांवर' घसरल्या, नव्या वादाला तोंड फुटलं
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 10:38 AM

भोपाळ: वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur )यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. (What is offensive in calling Shudras as Shudra asks bjp MP Sadhvi pragya)

साध्वी प्रज्ञा यांनी या कार्यक्रमात बोलताना जाती व्यवस्थेचे समर्थन केले. प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.

‘राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे’

राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार, असा सवाल साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थित केला.

साध्वी प्रज्ञांचा ममता बॅनर्जींवर निशाणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला होता. यावरून साध्वी प्रज्ञा यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य केले. आपली पश्चिम बंगालमधील सत्ता जाणार याची जाणीव झाल्याने ममता बॅनर्जींना वैफल्य आले आहे. आगामी वर्षात होणारी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून भाजप याठिकाणी ‘हिंदू राज’ आणेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

‘कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या

(What is offensive in calling Shudras as Shudra asks bjp MP Sadhvi pragya)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.