साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा

यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आणि मुंबई मध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठकांकडे पाठ फिरवली होती. | Udayanraje Bhosale

साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 5:57 PM

सातारा: मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. सुरुवातीला आयोजकांकडून उदयनराजे भोसले या परिषदेला उपस्थित राहणार, असे सांगितले जात होते. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांनाही या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले होते. यापैकी शिवेंद्रराजे या परिषदेला उपस्थित राहिले. मात्र उदयनराजे भोसले यांनी गोलमेज परिषदेकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आणि मुंबई मध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठकांकडे पाठ फिरवली होती. (Udayanraje Bhosale not attending Maratha Golmej Parishad in Satara)

दरम्यान, आजच्या गोलमेज परिषदेत आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी मराठा आंदोलकांना संबोधित केले. सध्या आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत असून आपल्याला जर आरक्षण हवे असेल तर एकत्र लढा द्यावा लागेल, अशी भावना देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलून दाखविली. अन्यथा इतिहास तुम्हाला आणि आम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे मराठा समाजाचे सामाजिक पानिपत होईल, असा इशारा शिवेंद्रसिंह राजे यांनी दिला.

सातारा येथे झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत सहा ठराव एकमुखी मंजुर करण्यात आले. या विभागीय मराठा आरक्षण परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हयांचे समन्वयक उपस्थित राहिले होते. यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश दादा पाटील यांनी शरद पवार हे जाणते राजे असून त्यांनी मराठा आरक्षणाची भुमिका स्पष्ट करावी असे मत यावेळी परिषदेत व्यक्त केले.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असुन अनेक मराठा संघटनांनी छत्रपतींचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाबाबत नेतृत्व करावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र पुणे, मुंबई आणि आज साताऱ्यात झालेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजे अनुपस्थित राहिल्यामुळे सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.

“गुणवत्तेनुसार आरक्षण द्या”

दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती

उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द

(Udayanraje Bhosale not attending Maratha Golmej Parishad in Satara)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.